Tuesday, 3 April 2018

माझ्या चिऊताईस...

झोपली आहेस शांत,कूस बदलून अलगद पुन्हा!
 वळताना क्षणभर मला टिपलं आहेस तू!!
माझं आश्वस्त अस्तित्व नेऊन सोडतं परत तुला परीराणीच्या राज्यात!
जिथे असतात मित्रमैत्रिणी,बाग,आणि पोहण्याचा तलावही!!
तुलाउठवते मी आता आणि आणते त्या राज्यातून बाहेर!
कारण मला दिसत असतं नं भोवतीचं अटळ वास्तव!!
काळ्याभोर कुंतलात तुझ्या फिरतो माझा हात!
लबाड भाव दिसतात मला निजभरल्या डोळ्यात!
ओठावर फुलतात तुझ्या हास्याच्या कळ्या!
झोपू दे गं आई,काही गाठायचं नाही आहे मला!!!
आठवतो मला गंध तुझ्या मऊसूत जावळाचा!
धूपगंधल्या टाळूचा, डोळ्यातल्या काजळाचा!!
वाटतं मला तुला असच झोपू द्यावं छान!
पण काय करु पिल्ला...
परीराणीचा देश नसतो मात्र,हे  आहे  मला भान!!!
आर्या.

Monday, 2 April 2018

कधी असं झालं आहे!
जीवांचं मैत्र फुललं आहे!!
जनामनात सगळे म्हणत राहिले भलतं!
मला मात्र दिसून गेले वात्सल्याचे अर्थ!!
पहात होते दुरुन मी हे सारं काही!
त्या दोघांना त्याची कल्पनाही नाही!!
झाली ती कधी त्याची वात्सल्यमूर्ती!
थकलेल्या जीवाची क्षणभर विश्रांती!!
लेकरालाच कळते नं आईची माया!
त्याच्या निग्रही मनात दडली तिची छाया!!
कधी पाहिलं मी त्याला बाप होताना!
तिच्या प्रत्येक घटनेचा साक्षीदार असताना!!
वडिलांचा धाक, पण तेवढीच काळजी!
तिच्या अल्लडपणात त्याने घातली रूंजी!!
प्रेम ,स्नेह,माया,वात्सल्यही आहे!
त्या दोघांच्या नात्याला परिसस्पर्श आहे!!
असं नातं जेव्हा जडत घडत जातं!
बकुळफुलाच्या गंधाने आयुष्यच उजळवतं!!!
आर्या.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...