Monday, 25 November 2019

ताम्हाणे बालकविता

दयाळ उठला भल्या सकाळी
शीळ मधुर त्याने घातली
झाडे जागी होऊ लागली
लगबग आता सुरू झाली!

अजून पाने स्तब्धच होती
हिरवी स्वप्नं पहात होती
वाऱ्यानेही अजून पुरती
पहाट चादर काढली नव्हती!

छोटी पाने चुळबूळ करती
डोळे किलीकिल करत पाहती
मोठी पाने आळस देती
वृक्षाई गोंजारत होती

दवबिंदूंनी अंघोळ घातली
पाने तजेलदार झाली
अंगावरती धुकं माखून
पाने आता सजून बसली

आला सूर्य क्षितिजावर
पाने करती नमस्कार
झाडे डुलती वाऱ्यावर
दिवस आला भरभर वर!




Wednesday, 13 November 2019

गुरुद्वारा भेट

एक परमात्मा सर्व व्यापून राहिला आहे असं गुरू नानक देव सांगून गेले आहेत. शिखांचे एकूण 10 गुरू झाले पण त्यानंतर आता कायमस्वरूपी गुरुवाणी गुरू ग्रंथ साहिब हेच सर्वांचे गुरू आहेत.
सत्याची कायम शिकवण देणारे नानकजी सत्याचे पुरस्कर्ते होते. त्यांची वाणी हीच आमची उपासना आहे. नानक हे व्यक्ती नसून ते एक विचारधारा आहेत असे आम्ही मानतो.
सत्याने वागण्याची शिकवण देण्यासाठी नानकजी यांनी यात्रा केल्या. मक्केला पारंपरिक पोशाख घालून ते गेले आणि तेथील मौलविना भेटून त्यांनी सांगितले की या चार भिंतीत ईश्वर बंदिस्त होऊ शकत नाही, तो सर्व व्यापून आहे.त्यामुळे तुम्ही कोणत्याही जीवनप्रणालीचे पुरस्कर्ते असलात तरी तुमच्या ठिकाणी राहून समाजाला आदर देणे महत्वाचे आहे.
महिलांच्या प्रती आदर हा भाव नानक देव यांनी रुजविला आहे. प्रेषित हा सुद्धा स्त्रीच्या पोटी जन्माला येतो त्यामुळे तिला आदर मिळणे आवश्यक आहे या विचारांचा प्रसार त्यांनी केला.
सूर्याला किंवा पितरांना दिलेले पाणी त्यांना पोहोचत नाही हे त्यांनी एका रुपकातून दाखवून दिले आणि गरजू आणि वंचित यांची सेवा करण्याची संधी घ्या असे सांगितले.
हठयोग, संसार त्याग, कर्मकांड याची आवश्यकता नसून स्वतः स्वतः ला मदत करा. नामजप करा आणि उन्नती साधा. कष्ट करा आणि स्वतः चे आयुष्य सांभाळा.त्यासाठी कुटुंबाचा त्याग करण्याची आवश्यकता नाही तर कुटुंबात राहून तुम्ही हे साधू शकता.
कोणतीही जात पात न पाळता सर्वांना समान आदर द्या. लंगर मध्ये सर्वजण एकाच पंक्तीत एकच प्रसाद घेतात हे याचे उत्तम उदाहरण आहे.
शीख संप्रदायाच्या साहित्यात कबीर, रामानंद, शेख फरीद, संत नामदेव, रोहिदास यांच्या साहित्याचास्वीकार केलेला दिसतो तो याच भूमिकेतून!हीच अखंड भारत जोडणारी साखळी आहे.😊
शिखांच्या नंतरच्या १० गुरूंनी काळाची पावले ओळखून तरुणांना आवाहन केले आणि पराक्रम करण्याचे महत्व सांगितले आणि शिकविले.
आपली वाणी आपल्या विचारातून प्रकट होते त्यामुळं चांगले विचार करा. सर्व गुरू हे अशा विचारातून ब्रह्मज्योत या संकल्पनेशी जोडले गेले आहेत.
प्रत्येक पानात परमात्मा आहे असे. असताना आपण सजीव फुल तोडतो आणि निर्जीव दगडावर वाहतो की जो दगड बोलत ही नाही!असे करण्यापेक्षा प्रत्येकाने ह्रदयात असलेली सुंदरता जपा. वारा पाणी हे सुद्धा आपले गुरू आहेत त्यामुळे निसर्गाचा आदर करा.
या जोडीने छिंदर सिंह जी यांनी स्वतः चे मत सांगितले की समाजावर असलेला आर्थिक पगडा लोकांना चंगळवादी बनकतो आहे ते मूळ विचारापासून दूर जात आहेत.त्यामुळे हे योग्य विचार प्रसार करून थांबविले पाहिजे.लोकांना धर्म शिकविला पाहिजे.
सेवा हे व्रत आमच्या विचारात रक्तात भिनले आहे त्यामुळे आम्ही ते सहज भावाने करतो.







Chhinder pal singh
प्रत्येक पानात परमात्मा फुल तोडू नका
ते तुम्ही निर्जीव दगडावर चढवीत आहेत
ह्रदयातेल सुंदरता जपा
वारा हा गुरू
पाणी हे गुरू
निसर्गात2परमात्मा शोध

लग्न
सकाळी 4
राजा रणजितसिंह यांच्या नातवाच लग्न

Thursday, 7 November 2019

कार्तिकी एकादशी

पहाटेचा वारा
त्यात "सावळा" भरीला
तरंगत तरंगत
भक्तिभाव पसरला!
भक्तांच्या मनात
विणेकऱ्याच्या स्वरात
पख्वाजाच्या नादात
ईश्वर जागा झाला!
संपविली निद्रा
चारमहिन्यांची
वेळ उठायची
त्याची झाली!
एकादशी कार्तिकाची
उजळली प्राची
ज्योत काकड्याची
क्षितीजावर!

Tuesday, 5 November 2019

मराठी रंगभूमी

#मराठी रंगभूमी
शारदेच्या पायातले नुपूर घरंगळतात
नटराजच्या तांडवात ताल सूर रेंगाळतात
अशी ही थोर योग्यांची कर्मभूमी
आपली मराठी रंगभूमी!
भाषेची नादमयता
शब्दांची भावात्मकता
भावनेची प्रांजळता
आपली मराठी रंगभूमी!
गंधर्वांचे वैभव
गुणिजनांचे लाघव
रसिक श्रोत्यांचा घेते ठाव
मराठी रंगभूमी!
हिची नांदी रंगते
मध्यंतर आसुसते
भरतवाक्य डोळा साठविते
मराठी रंगभूमी!

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...