Wednesday, 27 May 2020

नीराजनाची ज्योत

नीराजनाची ज्योत...

सीताबाई बाहेर आली. तांबडं फुटून दिवस वर आला तरी आज तिचं अजून आटपायचं होतं. गोठ्यातली गंगु हंबरून हाकारे देत होतीं. दावणीचं वासरूही भुकेने कासावीस झालं होतं. " आले रे सोन्या.. आज जरा उशीरच झाला बघ मलाही..."सीताक्काने वासराला प्रतिसाद दिला.

सीताक्का हे तिचं गावातलं नाव. तळकोकणातल्या छोट्याशा खेड्यात काहीशा जंगलातच सीताक्केचं घर. आता ती एकटीच होती. पूर्वी घर भरलं होतं तेव्हा लगबग असे. आता मुलं, सुना,लेकी, नातवंडं शहरात, पती देवाघरी आणि सीताक्का या घरात एकटीच.कोकणातल्या अनेक गावातल्या अनेक बायकांसारखी ती ही शूर. वाघरूही यायचं अधी मधी पण शूर सीताक्का त्यालाही विळ्याच्या धाकानं पळवून लावी. पण आता नजर जरा वयानुसार कमी झाली होती.त्यामुळे ती जपून राही.

सोबतीला असं कुणीच नाही आता. वरच्या अंगाच्या घरात तिचा एकुडा अविवाहित दीर राही. तो गावात पोस्टमन होता.निसर्गाच्या आवडीपायी इथेच राहिला. त्याच्या वडिलांनी त्याला शिक्षणासाठी भावंडांबरोबर मुंबईत नेला पण हा रमला नाही. गावाच्या ओढीने परत आला आणि एकटाच राहिला. म्हणायला त्याच्या सोबतीला पूर्वीपासूनचा गडी होता. रात्री दोघे अंगणात चांदण्या मोजीत गप्पा मारत बसत." या साली आंबा फळला नाही दादा. पुढल्या खेपेस अस्सा लगडंल की काय विचारता सोय नाही".

या घरांना निसर्गाने वरदान दिलं होतं हे मात्र खरं! हिरडा,बेहडा,बाभूळ,साग,अर्जुन नुसती रेलचेल होती. बकुळीच्या सड्याने मोसमात परस दरवळून जाई.
या घराला देवीच्या पालखीचा शेवटचा मान होता. हे घरंही खोताचंच! त्यामुळे सगळ्या गावाला भेटून देवळात परत जाताना देवी या घरी येई आणि इथूनच मंदिरात जाई.
पण आता नांदती घर हळूहळू बंद होत होती. पैशाच्या ओढीने शहराकडे धावत होती. मग अशी पिकली पानं रहाटानं पाणी काढता काढता डोळ्यातल्या पाण्यालाही झरू देत. वरच्या अंगाला विठ्ठलाचं मंदिर. तिथेही एक गडी असाच एकटा राही.त्याचंही गणगोत मुंबईलाच. वर्षाकाठी आंबे खायला सारी जमत. आठ दिवस राहून माघारी जात.
काळ सरला... वर्ष लोटली...महिने सरले..
कुणी कुणी काळाच्या आड गेले. घर पडली. जमीनदोस्त झाली. कुठे आठवणीचा एखादा खांब,देवघरातले देव मागे सोडून गेली.
आता अंगण परसात रान माजलं. वाडीतली लोक येऊन लाकडूफाटा, आंबे,काजू, फणस येऊन नेऊ लागली.कुणाचंच नियंत्रण उरलं नाही. पुढच्या पिढीला श्वास घ्यायला उसंत नाही तर गावातल्या घराकडे फिरकणार कोण?

सानिका म्हणजे सीताक्काची नात म्हणजे मुलीची मुलगी. तिला निसर्गाची खूप आवड. लहानपणी यायची गावी आजोळी. पण तेव्हा ती खूपच लहान होती तीन चार वर्षांची.आजी गेल्यावर तेही संपलं.पण सानिका मुळातच झाडात, पक्ष्यात, फुलात रमणारी. तिने शिक्षणही वेगळंच घेतलं. पर्यावरणशास्राचा अभ्यास केला. दापोलीला राहून वानिकी शिकली. तिथे अभ्यासासाठी फिरताना तिला आजोळ मात्र आठवे अगदी लहानपणी मनावर कोरलं गेलेलं!
एकदा तिने वडिलांंना सुट्टीत दापोलीला बोलावून घेतलं. तिथून तिचं आजोळ पाच तासांवर." बाबा मला आजीच्या गावी जायचय. आपलं म्हणजे तुमच्या आई वडिलांचं गाव असं नाहीच. मी जे शिकते आहे ते वापरण्यासाठी मला निसर्गाच्या सान्निध्यातच रहायचं आहे. आणि नव्याने काही शोधण्यापेक्षा त्या मोडकळीला आलेल्या घराचं,मातीचं नंदनवन करेन मी".
बाबांना ते जरा गैरसौयीचं वाटत होतं."सानू तू शहरात वाढलेली.तिथल्या सुविधांची तुला सवय आहे. तू तिथे कशी राहणार?"
" मी एकटी कुठे राहणार आहे? आणि नेहमी नाही काही. आपण जाऊन येउन करायचं."
सानूची आई,बाबा आणि मामा मामी यांना तिने एकत्रच केलं एक दिवस आपल्या घरी आणि कल्पना सांगितली.
" हे बघ सानू, तुझ्या हौसेसाठी इतके पैसे खर्च करायचं मला कठीण वाटतय.आधीच शहरात खर्च कमी आहेत का?" मामा म्हणाला.
" मामा तू परदेशात हिंडतोस. त्यांनी आपली घरं,संस्कृती जपली आहे असं सांगत!आम्हाला फोटो दाखवतोस आणि आपल्याच घराबद्दल असा विचार करतोस?"
" सानू, अग मामाला असं बोलतेस? लाडका असला तरी मोठा आहे तो तुझ्यापेक्षा". आईने तिला तोडलं.
"ताई, मलाही वाटतय की तुमची सानू आणि आमचा प्रह्लाद. दोघांनाही गाव नाही म्हणजे असूनही आता तिथे कुणी नाही..माझं माहेरही कोकणातलंच की. मी यांना कितीदा म्हटलं, पण यांना आवड नाही त्यामुळे ते काही उत्साह दाखवणार नाहीत. सुदैवाने सातबाराही तुम्हा बहीण भावांच्याच नावे आहे. कुणी तिसरा हक्कदार नाही. मग करा ना कायापालट. आपण खाऊन पिऊन सुखी आहोत. थोडं हाताशी आहे ते खर्च करण्याची शक्यताही आहे. मग मागे का जाता?" अर्थातच मामी.
" मला वाटतय की आपण या घराचा जमिनीचा विचार करावा. तिने त्यातलं शिक्षण घेतलं आहे आणि रुळलेल्या वाटेने न जाता ती वेगळं करु पाहते आहे." बाबा म्हणाले.
सानूच्या मामानेही अखेर या प्रस्तावाला होकार दिला केवळ सानूवरच्या प्रेमाखातर! शंका तर होतीच पण तिच्या उत्साही मनाला आवर घालणं कठीण होतं.
पण मामा म्हणाला," सानू मी आत्ता थोडीच रक्कम घालतो. तुमचं कितपत आणि कसं पुढे जातंय त्यावर पुढे ठरवेन. नाहीतर तुमच्या पोरखेळात पैशांची नासाडी व्हायची".
पण बाबा मात्र सानूच्या पाठीशी उभे राहिले आणि मामीही पाठिंबा देत राहिली सर्वतोपरी. कधी मामाच्या नकळतही!

आशिष, सुखदा, मयुरेश आणि सानिका अशी चौकडी नेहमी सोबत असे.ती इथेही सोबत राहिली. सानिकाचे बाबा त्यांना गावी घेऊन आले. देवीहसोळ नावाचं ते गाव ... निसर्गाचा वरदहस्तच!
या चौकडीने मग चंगच बांधला. त्यांच्या जोडीला वास्तुस्थापत्य शिकणारे अजून दोन मित्र आले.
"थोडा खर्च करावा लागेल पण ही वास्तु पुन्हा उभी करू शकतो आपण.. पण निसर्गपूरकच करू. माती, बांबू वापरून."उन्मेष आणि आतिश म्हणाले.
अंतिम वर्षाचा प्रकल्प म्हणून चौकडीने या वास्तूचं आणि निसर्गाचं पुनरुज्जीवन करायचं ठरवलं.
गावात दोन खोल्या भाड्याने घेतल्या. स्वयंपाकाला मावशी शोधल्या. आणि आई वडिलांनी दिलेल्या पैशातून कमीतकमी खर्चात त्यांनी वास्तू स्वतः बांधून पुन्हा उभी केली. तीनच मोजक्या खोल्या. पण सुरेख रेखल्या.शेतातलीच माती, गावातल्या जुन्या घराचं साहित्य असं वापरून उन्मेष आणि आतिशनं घर रेखून दिलं.त्यांचाही तो अभ्यासाचा प्रकल्पच होऊन गेला.
"सीताक्काच्या नातीने घराला नवं दिस दाखवलं पहा जनु." गाव बोलू लागलं.
जमीन नांगरण्यापासून, वाढलेलं जंगल कापण्यापासून सगळं मुलांनी केलं. गावातले हातही लागले कामाला.
हळूहळू वर्तमानपत्रांनी याची दखल घेतली. युवा समाज माध्यमांवर मुलाखत झाली. गावात येऊन चित्रीकरणही झालं.
महाविद्यालयाचे शिक्षकही पहायला आले आणि म्हणाले," चार भिंतीच्या आतलं ज्ञान तुम्ही प्रत्यक्ष अभ्यासून पहात आहात. जगून पहात आहात. तुम्ही इथली वृक्षगणना केली.दुर्मिळ वनस्पती, झाडं नोंदवली. आधुनिक काळातही निसर्गपूरक पद्धत वापरून कमी खर्चात घर पुन्हा उभारलंत. तुमची वेगळी परीक्षा घ्यायलाच नको आहे. खरंतर प्रत्येक विद्यार्थ्याने असं करून पहायला हवं! पण तुला ते सुचलं हे तुझं आणि तुझ्या मित्र मैत्रीणींचं कौतुक हो सानिका।".

सानिकाच्या मित्र -मैत्रिणींचे आई वडीलही शनिवार रविवार येऊ लागले. लाडू,चिवडे, केक, बिस्कीटे असा खाऊ डबे भरभरून येऊ लागला. कुणाची आई आली की मुलांची मज्जाच असे.बाबा मंडळीही उत्साहाने घराच्या शेताच्या कामात सहभाग घेत.भाड्याने घेतलेल्या दोन खोल्या मग रहायला कमी पडत पण आनंदाने भरुन जात".
"छानच चाललय हो.आणखी काही लागलं तर सांगा. माझा एक मित्र आर्किटेक्ट आहे. माझी मैत्रीण एका वनस्पतीवर संशोधन करते आहे परदेशात." असं कुणी सांगितलं की मुलांचा हुरूप वाढे.एकदा तर चक्क सानिकाचा मामा आला स्वतःच! नुकताच परदेश वारी करुन आला होता. भरपूर चाॅकलेटस् त्याने मुलांसमोर ओतली. एरवी सुटाबूटात वावरणारा मामाही आपल्या मूळ घराची जमिनीची बदलती रूपं पाहून इथल्या मातीच्या रंगात रंगून गेला! आई वडिलांच्या आणि बालपणीच्या आठवणीत रमला. जुन्या मित्रांना भेटला.त्यांच्यातलाच होऊन गप्पा मारू लागला. हे घर त्याला आपलंच असूनही परकं वाटत होतं ते पुन्हा आपलंच वाटू लागलं. सानिकाच्या गालावर आपल्या मातीभरल्या हातांनीच त्याने कौतुकाची बोटं रेखली तेव्हा त्याच्या डोळ्यातलं पाणी सानिकानेही क्षणात टिपलं! सीताक्काचं घर आता असं सर्वांचंच झालं होतं!

घर बांधून झालं होतंच. समोर जमीन स्वच्छ करुन मुलांनीच सारवली होती गावातनं शेण आणून! समोर छोटी बाग लावली होती. घर आता नांदतं झालं होतं आणि मुलांंना परतीचे वेध लागले होते. मामा आणि आईने आता इथे गडी ठेवायचं सहमतीने ठरवल. त्यामुळे घर
सांभाळलं जाईल आणि मुलं येतील तेव्हा त्यांना मदत पण होईल.सानिकाला आता इथे सेंद्रिय शेती करून पहायचं मनात होतं.. आपल्यासाठी.. आपल्या आनंदासाठी...

घराच्या खोलीत खणताना हे बघ काय सापडलय सानू. एक मोत्याची बुगडी आणि एक नीराजन. कुठे होत हे?"
"अग सापडलेलं असं छोटं मोठं मी एकत्र करून ठेवलं होतं. म्हटलं सगळं झाल्यावर तुला दाखवू निवांत."उन्मेष म्हणाला.
सानूने आईला फोटो पाठवलयावर तिने लगेच ओळखलं. सानू ही तर सीताक्काची बुगडी! आणि तुळशीपुढचं नीराजन"!
मुलांनी दुसर्‍या दिवशी लगेच मातीचा चौथरा केला. त्यावर कुंडीचा आकार देऊन ती रोवली.शेजारच्या वाडीतून तुळस आणवली आणि लावली. सानूने निराजन घासलं. दुकानातून तूप, वात आणली आणि तुळशीपुढे तेच नीराजन लावलं! उद्या परत निघायचं होतं. दोन महिने इथे राहिल्यावर आता अंतिम परीक्षेची तयारी आणि या प्रकल्पाचं सादरीकरण या सहाजणांना आपापल्या ठिकाणी करायचं होतं.
रात्री झोपेत तिला क्षणभर भास झाला.. दोन आजोबा आणि एक आजी या नव्या घराच्या अंगणात बसून चांदण्या मोजत गप्पा मारत आहेत.

Tuesday, 26 May 2020

कथा श्रीरंगची

"अरे श्रीरंग,आता काय करणार तू?या अशा परिस्थितीत तुला पुढचे किमान तीन आठवडे सदानंदच्या घरीच रहावं लागणार आहे.तरी मी तुला सांगत होते की काही गरज नाही आहे जायची त्याच्या गावी उत्सव पहायला"
"अग आई हो हो हो.मी इथे मजेत आहे.तू अजिबात काळजी करू नकोस.सदाचं घर भरपूर मोठ्ठं आहे.पडवी,ओसरी,माजघर,स्वयंपाकघर,अंगण,परस सगळं काही सुरेख आहे.त्याची वाडीही किती सुबक आहे.सगळे आहेत इथे काळजी घ्यायला माझी"
"अरे पण या भयंकर साथीने जग हादरलय सगळं बाळा! कसं कळत नाही तुला"
"आई इथे गावातही लोक घरातच बसून आहेत.ग्रामपंचायतीतर्फे सरपंच सूचना देत आहेत.पोलिस फिरत आहेत."
"हॅलो हॅलो...
शेवटी फोन बंदच झाला.सदा आणि श्री काॅलेजमधले मित्र.सदाचं गाव कोकणात.आई बाबा मोठा दादा तिथे असत.सदा शिकायला पुण्यात होता.सदाच्या घराचं,शिमग्याचं वर्णन ऐकूनश्रीसुद्धा यावेळी हट्टाने त्याच्याबरोबर गावी गेला आणि एका जगाला हादरवून सोडणार्‍या आजाराने सगळं जग ठप्प झालं.
श्रीची आई आणि वडिल नक्कीच काळजीत पडले पण या आडवाटेवरच्या गावात आपण शहरापेक्षा अधिक सुखात आहोत असं सारखं श्री ला वाटत होतं.
" चला रे मुलांनो,जरा दोन खळ्यांची भाजावळ करूया. परवा नांगरट करूया. काय आता आठवडी बाजारही बंद आहे.तेव्हा जरा चार भाज्या लावूया.आपल्यालाही होतील आणि गावातही विकल्या जातीलच". सदाचे बाबा म्हणाले.
श्रीला सतत समजत होतं की मोठ्या शहरात सगळेजण घरात अक्षरशः कैद झालेत पण इथे मात्र आपल्याला वाडीत मस्त फिरायला मिळतय.नारळीपोफळीच्या थंड सावलीत मस्त गप्पा मारत दुपार कशी संपते ते ही कळत नाही.
सदाचे चार मित्र येऊन दोन दिवस क्रिकेटही खेळून गेले होते इथे.पण आता मात्र सगळ्यांनीच ठरवलं होतं की जरा आपापल्या घरीच राहूयात.ते सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक आहे.
सदाच्या घराच्या पुढच्या सारवलेल्या पडवीत नाहीतर अंगणात चांदण्या मोजत रात्री दोघे गप्पा मारीत झोपत.
भल्या सकाळी किंबहुना पहाटेच कोंबडा आरवला की झोप चाळवली जाई. सदाचा दादा गोठ्यात म्हशींचं दूध काढायला जात असे. आह्निकं उरकून आलं की वहिनी गरम चहाऐवजी दुधाचे पेलेच देत असे पुढे.तेही चुलीवर तापवलेलं दूध.
"इथे दूध इतकं सुंदर आहे आणि भरपूर पीता येतं आहे आणि तिकडे लाॅकडाऊनमुळे दूधही मिळत नाही आहे रोज चहाला सुद्धा" श्रीचं म्हणणं ऐकून वहिनी हसली फक्त.
गावात असंच असत अहो.माझं माहेरही पलीकडेच आहे नदीच्या.आमच्याही घरीशेती,दुभतं आहे.कमी कशाचीच नाही.कष्ट मात्र खूप हं!।
हे झाल्यावर दररोज सदाचे वडिल,सदा आणि श्रीरंग किजू शोधायला बाहेर पडत असत. मोठमोठ्या टोपल्या भरून काजूखालचे काजू वेचून आणण्यात आणि गप्पात वेळ सरे.
मग घरी आल्यावर मऊ तांदळाची भाकरी,मऊ भात ,खिमट असं काहीतरी खाऊन मग थोडावेळ टीव्ही पाहणं.पण फारसं नाहीच.
सदाचे बाबा शेतात जात किंवा गोठास्वच्छ करत किंवा काही दुरुस्तीची कामं.एखादा गडी रोज येत होता कामाला.तो काजू सोलत असेनाहीतर एखाद्या मावशी आल्या तर सदाची आई त्यांना काही काम सांगत असे.हे सर्व अनुभवण्यातच श्री रमला होता. विहिरीवर जाऊन थंडगार पाण्याने अंघोळ आणि धमाल झाली की जेवणाची हाळी येई. सकाळी लवकर अंघोळ झाली तर परसात पाणचूल असे त्यावरच्या हंड्यातलं मस्त उकळतं पाणी मिळे.केळीच्या आडोशानेही अंघोळ करताना मजा येई.
फणस,काजू ,केळफूल अशी मस्त भाजी, भाकरी,आमटी भात कधी कुळथाची पिठी असं पोटभर जेऊन मग सुपारीच्या बागेत दुक्कल जाई.
" सदा इथे आयुष्य किती सुरळित सुरु आहे. जिथे उंबराही ओलांडता येत नाही आहे जगाला तिथे आपण मात्र मस्त भटकतोय"
"होय श्री.कारण आम्ही आमचं अंगण राखलय.शेती सांभाळली आहे.वाडी जिवंत ठेवली आहे.मी शिकायला आलो खरा पण जरा हाती पैसा आला की मी ही दादासारखाच इथेच राहणार आहे. आपली माणसं आणि आपली माती यासारखं सुख नाही रे".शहरात पैसा आहे पण इथे शांतता आणि समाधान आहे. तूच पाहतो आहेस ना की आपल्याला इथे कळतही नाही आहे की जगात केवढी उलथापालथ होते आहे.या मोकळ्या स्वच्छ हवेत श्वास घेणं किती सोपं आहे.
आपण संध्याकाळी वाडीत फिरतो.पुन्हा धार काढतो मी तेव्हाही तू येतोस. दादाची कामं सुरू असतातच दिवसभर.मिरीला पाणी दे. सुपारीची बाग स्वच्छ ठेव.
मोहोरावर ठेव आमराईत. तीनसांज कधी उतरते कळतही नाही.
संध्याकाळी निरांजनाच्या प्रकाशात उजळलेला आईचा चेहरा मला पहायला रोज आवडतो.आजी आजोबा होते तेव्हा तर मजा यायची.
माझी आत्या आणि काका दोघेही अमेरिकेत. पण इथे कधीच येत नाहीत.बालपण इथेच गेलं पण आता यावंसं वाटत नाही. पण आम्ही सुखी आहोत श्री.तू पाहतो आहेसच".
श्रीने मोबाईल पाहिला.आईला फोन करायला हवा होता.रेंज आली होती जरा. पण त्याला तेही नको वाटलं.आई बाबा तेच सांगणार.. आज इथे हे बंद.अमकीकडे इतके मृत्यू.तमकीकडे राजकीय चर्चा....
कदाचितसदाच्या आईने मन वाचलं असावं त्याचं."श्रीरंग.. अरे आई ही आई असते.काळजी करणारच.पण म्हणून तू टाळू नकोस त्यांना.तुला फिरून तिथेच जायचं आहे. पण इथल्या आठवणी मात्र कायम सोबत ठेव मनात.कधीही उदासवाणं वाटलं तर हक्काने ये हो इथे"....
श्रीला हे लोभसवाणं जीवन खरंच आवडलं मनापाहून.इथे सगळे आयुष्य "जगत" होते पण "धावत" नव्हते.आयुष्य जस आणि ज्या गतीने नेईल ती गती त्यांनी स्वीकारली होती आणि तो आनंद त्यांचं घरदार अंगण परस वाडी उजळून टाकत होता.

समिंद्रा

समिंद्रा आज जरा उदास होती. अजून नाव घेऊन गेलेले तिचे बाबा परत आले नव्हते! आई पण थोडी काळजीत होती. भर समुद्रात बाबांचं आणि तिच्या दादाचं,काकाचं बरेच दिवस जाणं आता तिला सवयीचं झालं होतं! पण तरी अजूनही तिला सर्वांची आठवण येतच असे.
बाबा मोकळ्या वेळात तिला होडीवर घेऊन जात. काका होडीची किरकोळ दुरुस्ती करीत असे. ती ठाकठाक आवाजाची गंमत तिला आवडे.दादा तिच्याशी वाळूत क्रिकेट खेळत असे. समुद्रात चेंडू गेला की तो आणण्यासाठी दादाबरोबर पोहत जायला तिला गंमत वाटे.कोळ्याचीच लेक ती लाटांवर नाही पहुडली तर मजा काय?
पण आज मात्र बाजार भरला तरी घरची नाव काही दिसेना!
आजानेही चौकशी केली. पण घरच्या नावेचा पत्ता नव्हता.बंदरावरच्या आॅफिसमधे आईच्या खेपा सुरु झाल्या होत्या पण बहुधा नावेपर्यंत सिग्नल पोचत नव्हता असं काहीतरी तिथले लोक सांगत होते!
संध्याकाळ उतरत होती! ज्या नावा मासे घेऊन परतल्या होत्या त्यांच्यातले मासे उतरवले जात होते.शेजारपाजारच्या कोळणी आपापले मासे वेताच्या टोपलीत घालून धुवत होत्या.धुतलेले मासे दुसरं कुणीतरी चिरून ठेवत होतं! टोपल्या टोपल्यातून वेगवेगळ्या रंगाचे,आकाराचे मासे मांडून ठेवले जात होते. त्यावर ताव मारायला समुद्रपक्षी आकाशातून किनार्‍यावर झेपावत होते. माशांची साठवण करायला काहीजण यंत्रावर काढलेला बर्फाचा चुरा विकत घेत होते. तो बर्फ खायला समिंद्राला आवडत असे.गारगार बर्फ हळूच जिभेवर विरघळे! पण आज मात्र तिचं कशाकशात लक्ष लागत नव्हतं! ती नुसतंच हे सगळं पाहत होती!साठवणीचे मासे संपल्यामुळे आई,आजा सगळे थंड बसून नावेकडे डोळा लावून होते!
बाजार संपत आला तशी गर्दी ओसरायला लागली! आजूबाजूचे येऊन चौकशी करू लागले! सर्जा वेसावकर काका आले. "वर्दी कळवायला हवी पोलिसात जाऊन" असं आईला म्हणाले!
पण समिंद्रा मात्र हे एकून तडक समुद्राकडेच धावली!
तिच्या डोळ्यात पाणी जमा झालं होतं!
"सागरद्येवा! तुझी मी लाडाची आहे नं रे! म्हणून तर तुझं आणि माझं नावसुद्धा एकच आहे! माझं ऐकशील का?
लहान मुलांचं सगळ्ळं ऐकतो देव असं मोठी माणसं म्हणतात! ऐक नं रे माझं! आणि माझ्या घरच्या लोकांना घरी घेऊन ये रे लवकर! किती वाट पाहते आहे मी!
तू जर त्यांना आणलंस तर माझा चेंडू मी तुला खेळायला देऊन टाकेन.पण आण नं रे लवकर घरी सगळ्यांना! मी माझ्या होडीची पण वाट पाहते आहे! पुनवेला मला तिच्यावर जाऊन नाचायला भारी आवडतं! आण ना रे लवकर!!!! सर्वांना..."
समिंद्रा हिरमुसली होती पण वाट पाहत होती!!
रात्र व्हायला लागली.आजी आणि आजाबरोबर ती घरी जायला निघाली! आई शेजारच्या तांडेल काकांबरोबर पोलिसाकडे जायला तयार झाली.
समिंद्रा मागे वळून वळून समुद्रदेवाला सांगत होती!!!!
तशीच घरी पोहोचली.जेवली नाही की झोपली नाही!!!
सकाळ व्हायला थोडा वेळ होता तेवढ्यात दारात बसलेला आजा उठला आणि धावत सुटला किनार्‍यावर!
समिंद्राने पाहिलं तर नाव किनार्‍याला लोटत बाबा दादा काका येत होते!!! ती इतकी खुश झाली की नाचायलाच लागली!
दिशा न मिळाल्याने भर समुद्रात नाव भरकटली होती पण आकाशातल्या धुरूव बाळाने दिशा दिली होती नावेला!!!
सगळे सुखरूप परत आले! सगळा कोळीवाडा जमा झाला होता!
बाबा दादा समिंद्राला शोधत होते! खूप दमले होते पण छोट्या समिंद्राला तेही खूप दिवस भेटले नव्हते नं!
पण समिंद्रा कुठे होती! आपल्या मुठीतला चेंडू सागरदेवाला खेळायला देण्यासाठी ती केव्हाच किनार्‍यावर पोहोचली सुद्धा होती!!!

लष्करप्रमुख मनोज नरवणे

लष्कराच्या पूर्व मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे हे भारताचे नवे लष्करप्रमुख म्हणून नियुक्त झाले आहेत.
जनरल अरुणकुमार वैद्य (१९८३- १९८६) यांच्यानंतरचे महाराष्टाचे सुपुत्र असलेले नरवणे हे लष्करप्रमुख पदाची धुरा सांभाळत आहेत. एप्रिल २०२२ पर्यंत ते आपला पदभार सांभाळतील.
लष्करप्रमुखांचे वडिल मुकुंद नरवणे हे हवाई दलातील निवृत्त अधिकारी आहेत तसेच ऐतिहासिक विषयांवर त्यांनी पुस्तकेही लिहिली आहेत.त्यांच्या आई सुधा नरवणे या एक प्रसिद्ध लेखिका होत्या तसेच पुणे आकाशवाणीवर निवेदिका म्हणून कार्यरत होत्या.
नरवणे यांचे शालेय शिक्षण पुण्याच्या ज्ञान प्रबोधिनी प्रशालेत झाले आहे.शालेय वयापासूनच ते हुशार आणि सर्व क्रीडा प्रकारात कुशल असे विद्यार्थी होते. १९७६ साली प्रबोधिनीतून दहावीची परीक्षा ते उत्तीर्ण झाले.
राष्टीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडी च्या कठीण अशा चाचण्यांमधून लीलया उत्तीर्ण होत त्यांनी एनडीए मधील आपले प्रशिक्षण पूर्ण केले.त्यानंतर डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकादमीमधील खडतर प्रशिक्षणही त्यांनी पूर्ण केले.
डिफेन्स स्टडीज या विषयात नरवणे यांनी चेन्नई विद्यापीठाची पदवी प्राप्त केली आहे तसेच डिफेन्स अँड मॅनेजमेंट स्टडीज या विषयात एम.फील पदवीही प्राप्त केली आहे.
जून १९८० साली ७ शीख लाईफ इनफंट्रीमधून त्यांनी आपल्या लष्करातील सेवेची सुरुवात केली.
त्यांची लष्करातील कामगिरी प्रेरणादायी आहे ती समजून घेऊया.
लष्करातील आपल्या कामात नैपुण्य दाखवत त्यांनी आसाम रायफल्सचे महानिरीक्षक म्हणून काम केले आहे. जम्मू आणि काश्मीरमधे राष्टीय रायफल्सचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले.गेली अनेक वर्षे संघर्षमय राजकीय स्थिती असलेल्या या प्रांतांमधे त्यांनी आपल्या नेतृत्वकौशल्याच्या आधारे आपले काम चोख बजावले आहे.म्यानमार येथे भारताचे डिफेन्स अटॅची म्हणूनही त्यांनी जबाबदारी पूर्ण केली आहे.मध्य प्रदेशातील महु येथील लष्करी प्रशिक्षण केंद्रात त्यांनी प्रशिक्षक म्हणूनही महत्वाचे काम केले आहे.
केवळ इतकेच नाही तर कोलकाता येथील लष्करी प्रशिक्षण कमांडचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
अनुभवाचा, नेतृत्वाचा आणि देशाच्या लष्करसेवेतील गुणवत्तापूर्ण कामगिरीचा हा चढता आलेख असल्यानेच नरवणे यांच्याकडे देशाच्या लष्करप्रमुख पदाची महत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे हे तुमच्या लक्षात आलं असेलच!
या सर्व कारकिर्दीची नोंद घेत मनोज नरवणे यांना अनेक सन्मानांनी गौरविण्यात आले आहे!
परमविशिष्ट सेवा पदक,अतिविशिष्ट सेवा पदक,सेना पदक अशी अनेक पदके त्यांच्या देशाभिमानाची आणि देशाप्रती आस्थेची साक्ष देत त्यांच्या छातीवर विराजमान झाली आहेत.
आपल्या यशाचे गमक उलगडताना लष्करप्रमुख नोंदवितात की चित्रकला आणि अभियांत्रिकी हे त्यांचे आवडते विषय.त्यामुळे कोणत्याही प्रश्नाकडे तीन कोनातून पाहण्याची सवय हे त्यांच्या यशाचे गमक आहे.याखेरीज देशाची सेवा करताना झपाटलेपणा,समर्पित भावना आणि सकारात्मकता हे गुण आपल्याला सर्वोच्च पदावर नेऊ शकतात असेही त्यांचे मत आहे.आपल्या शालेय जीवनात मिळालेले बाळकडू आयुष्यभर आपल्याबरोबर आहे असेही ते नमूद करतात.
कुशल नेतृत्व,खिलाडू वृत्ती,सकारात्मकता असे गुण अंगी असलेले भारताची लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे!
लहानपणापासून मनात देशप्रेम आणि देशाविषयी आस्था बाळगत आपल्या देशाचे रक्षण करण्याचा सर्वोच्च बहुमान त्यांना प्राप्त झाला आहे!
त्यांच्या व्यक्तिमत्वातील हे गुण आपणही अंगी बाणवण्याचा प्रयत्न करूया! या प्रजासत्ताकदिनी देशाप्रती आस्था व्यक्त होईल अशी पराक्रमी कृती करण्याचा निश्चय करूया!

Saturday, 23 May 2020

नीराजनातील ज्योत..

सीताबाई बाहेर आली. तांबडं फुटून दिवस वर आला तरी आज तिचं अजून आटपायचं होतं. गोठ्यातली गंगु हंबरून हाकारे देत होतीं. दावणीचं वासरूही भुकेने कासावीस झालं होतं. " आले रे सोन्या.. आज जरा उशीरच झाला बघ मलाही..."सीताक्काने वासराला प्रतिसाद दिला.

सीताक्का हे तिचं गावातलं नाव. तळकोकणातल्या छोट्याशा खेड्यात काहीशा जंगलातच सीताक्केचं घर. आता ती एकटीच होती. पूर्वी घर भरलं होतं तेव्हा लगबग असे. आता मुलं, सुना,लेकी, नातवंडं शहरात, पती देवाघरी आणि सीताक्का या घरात एकटीच.कोकणातल्या अनेक गावातल्या अनेक बायकांसारखी ती ही शूर. वाघरूही यायचं अधी मधी पण शूर सीताक्का त्यालाही विळ्याच्या धाकानं पळवून लावी. पण आता नजर जरा वयानुसार कमी झाली होती.त्यामुळे ती जपून राही.

सोबतीला असं कुणीच नाही आता. वरच्या अंगाच्या घरात तिचा एकुडा अविवाहित दीर राही. तो गावात पोस्टमन होता.निसर्गाच्या आवडीपायी इथेच राहिला. त्याच्या वडिलांनी त्याला शिक्षणासाठी भावंडांबरोबर मुंबईत नेला पण हा रमला नाही. गावाच्या ओढीने परत आला आणि एकटाच राहिला. म्हणायला त्याच्या सोबतीला पूर्वीपासूनचा गडी होता. रात्री दोघे अंगणात चांदण्या मोजीत गप्पा मारत बसत." या साली आंबा फळला नाही दादा. पुढल्या खेपेस अस्सा लगडंल की काय विचारता सोय नाही".

या घरांना निसर्गाने वरदान दिलं होतं हे मात्र खरं! हिरडा,बेहडा,बाभूळ,साग,अर्जुन नुसती रेलचेल होती. बकुळीच्या सड्याने मोसमात परस दरवळून जाई.
या घराला देवीच्या पालखीचा शेवटचा मान होता. हे घरंही खोताचंच! त्यामुळे सगळ्या गावाला भेटून देवळात परत जाताना देवी या घरी येई आणि इथूनच मंदिरात जाई.
पण आता नांदती घर हळूहळू बंद होत होती. पैशाच्या ओढीने शहराकडे धावत होती. मग अशी पिकली पानं रहाटानं पाणी काढता काढता डोळ्यातल्या पाण्यालाही झरू देत. वरच्या अंगाला विठ्ठलाचं मंदिर. तिथेही एक गडी असाच एकटा राही.त्याचंही गणगोत मुंबईलाच. वर्षाकाठी आंबे खायला सारी जमत. आठ दिवस राहून माघारी जात.
काळ सरला... वर्ष लोटली...महिने सरले..
कुणी कुणी काळाच्या आड गेले. घर पडली. जमीनदोस्त झाली. कुठे आठवणीचा एखादा खांब,देवघरातले देव मागे सोडून गेली.
आता अंगण परसात रान माजलं. वाडीतली लोक येऊन लाकडूफाटा, आंबे,काजू, फणस येऊन नेऊ लागली.कुणाचंच नियंत्रण उरलं नाही. पुढच्या पिढीला श्वास घ्यायला उसंत नाही तर गावातल्या घराकडे फिरकणार कोण?

सानिका म्हणजे सीताक्काची नात म्हणजे मुलीची मुलगी. तिला निसर्गाची खूप आवड. लहानपणी यायची गावी आजोळी. पण तेव्हा ती खूपच लहान होती तीन चार वर्षांची.आजी गेल्यावर तेही संपलं.पण सानिका मुळातच झाडात, पक्ष्यात, फुलात रमणारी. तिने शिक्षणही वेगळंच घेतलं. पर्यावरणशास्राचा अभ्यास केला. दापोलीला राहून वानिकी शिकली. तिथे अभ्यासासाठी फिरताना तिला आजोळ मात्र आठवे अगदी लहानपणी मनावर कोरलं गेलेलं!
एकदा तिने वडिलांंना सुट्टीत दापोलीला बोलावून घेतलं. तिथून तिचं आजोळ पाच तासांवर." बाबा मला आजीच्या गावी जायचय. आपलं म्हणजे तुमच्या आई वडिलांचं गाव असं नाहीच. मी जे शिकते आहे ते वापरण्यासाठी मला निसर्गाच्या सान्निध्यातच रहायचं आहे. आणि नव्याने काही शोधण्यापेक्षा त्या मोडकळीला आलेल्या घराचं,मातीचं नंदनवन करेन मी".
बाबांना ते जरा गैरसौयीचं वाटत होतं."सानू तू शहरात वाढलेली.तिथल्या सुविधांची तुला सवय आहे. तू तिथे कशी राहणार?"
" मी एकटी कुठे राहणार आहे? आणि नेहमी नाही काही. आपण जाऊन येउन करायचं."
सानूची आई,बाबा आणि मामा मामी यांना तिने एकत्रच केलं एक दिवस आपल्या घरी आणि कल्पना सांगितली.
" हे बघ सानू, तुझ्या हौसेसाठी इतके पैसे खर्च करायचं मला कठीण वाटतय.आधीच शहरात खर्च कमी आहेत का?" मामा म्हणाला.
" मामा तू परदेशात हिंडतोस. त्यांनी आपली घरं,संस्कृती जपली आहे असं सांगत!आम्हाला फोटो दाखवतोस आणि आपल्याच घराबद्दल असा विचार करतोस?"
" सानू, अग मामाला असं बोलतेस? लाडका असला तरी मोठा आहे तो तुझ्यापेक्षा". आईने तिला तोडलं.
"ताई, मलाही वाटतय की तुमची सानू आणि आमचा प्रह्लाद. दोघांनाही गाव नाही म्हणजे असूनही आता तिथे कुणी नाही..माझं माहेरही कोकणातलंच की. मी यांना कितीदा म्हटलं, पण यांना आवड नाही त्यामुळे ते काही उत्साह दाखवणार नाहीत. सुदैवाने सातबाराही तुम्हा बहीण भावांच्याच नावे आहे. कुणी तिसरा हक्कदार नाही. मग करा ना कायापालट. आपण खाऊन पिऊन सुखी आहोत. थोडं हाताशी आहे ते खर्च करण्याची शक्यताही आहे. मग मागे का जाता?" अर्थातच मामी.
" मला वाटतय की आपण या घराचा जमिनीचा विचार करावा. तिने त्यातलं शिक्षण घेतलं आहे आणि रुळलेल्या वाटेने न जाता ती वेगळं करु पाहते आहे." बाबा म्हणाले.
सानूच्या मामानेही अखेर या प्रस्तावाला होकार दिला केवळ सानूवरच्या प्रेमाखातर! शंका तर होतीच पण तिच्या उत्साही मनाला आवर घालणं कठीण होतं.
पण मामा म्हणाला," सानू मी आत्ता थोडीच रक्कम घालतो. तुमचं कितपत आणि कसं पुढे जातंय त्यावर पुढे ठरवेन. नाहीतर तुमच्या पोरखेळात पैशांची नासाडी व्हायची".
पण बाबा मात्र सानूच्या पाठीशी उभे राहिले आणि मामीही पाठिंबा देत राहिली सर्वतोपरी. कधी मामाच्या नकळतही!

आशिष, सुखदा, मयुरेश आणि सानिका अशी चौकडी नेहमी सोबत असे.ती इथेही सोबत राहिली. सानिकाचे बाबा त्यांना गावी घेऊन आले. देवीहसोळ नावाचं ते गाव ... निसर्गाचा वरदहस्तच!
या चौकडीने मग चंगच बांधला. त्यांच्या जोडीला वास्तुस्थापत्य शिकणारे अजून दोन मित्र आले.
"थोडा खर्च करावा लागेल पण ही वास्तु पुन्हा उभी करू शकतो आपण.. पण निसर्गपूरकच करू. माती, बांबू वापरून."उन्मेष आणि आतिश म्हणाले.
अंतिम वर्षाचा प्रकल्प म्हणून चौकडीने या वास्तूचं आणि निसर्गाचं पुनरुज्जीवन करायचं ठरवलं.
गावात दोन खोल्या भाड्याने घेतल्या. स्वयंपाकाला मावशी शोधल्या. आणि आई वडिलांनी दिलेल्या पैशातून कमीतकमी खर्चात त्यांनी वास्तू स्वतः बांधून पुन्हा उभी केली. तीनच मोजक्या खोल्या. पण सुरेख रेखल्या.शेतातलीच माती, गावातल्या जुन्या घराचं साहित्य असं वापरून उन्मेष आणि आतिशनं घर रेखून दिलं.त्यांचाही तो अभ्यासाचा प्रकल्पच होऊन गेला.
"सीताक्काच्या नातीने घराला नवं दिस दाखवलं पहा जनु." गाव बोलू लागलं.
जमीन नांगरण्यापासून, वाढलेलं जंगल कापण्यापासून सगळं मुलांनी केलं. गावातले हातही लागले कामाला.
हळूहळू वर्तमानपत्रांनी याची दखल घेतली. युवा समाज माध्यमांवर मुलाखत झाली. गावात येऊन चित्रीकरणही झालं.
महाविद्यालयाचे शिक्षकही पहायला आले आणि म्हणाले," चार भिंतीच्या आतलं ज्ञान तुम्ही प्रत्यक्ष अभ्यासून पहात आहात. जगून पहात आहात. तुम्ही इथली वृक्षगणना केली.दुर्मिळ वनस्पती, झाडं नोंदवली. आधुनिक काळातही निसर्गपूरक पद्धत वापरून कमी खर्चात घर पुन्हा उभारलंत. तुमची वेगळी परीक्षा घ्यायलाच नको आहे. खरंतर प्रत्येक विद्यार्थ्याने असं करून पहायला हवं! पण तुला ते सुचलं हे तुझं आणि तुझ्या मित्र मैत्रीणींचं कौतुक हो सानिका।".

सानिकाच्या मित्र -मैत्रिणींचे आई वडीलही शनिवार रविवार येऊ लागले. लाडू,चिवडे, केक, बिस्कीटे असा खाऊ डबे भरभरून येऊ लागला. कुणाची आई आली की मुलांची मज्जाच असे.बाबा मंडळीही उत्साहाने घराच्या शेताच्या कामात सहभाग घेत.भाड्याने घेतलेल्या दोन खोल्या मग रहायला कमी पडत पण आनंदाने भरुन जात".
"छानच चाललय हो.आणखी काही लागलं तर सांगा. माझा एक मित्र आर्किटेक्ट आहे. माझी मैत्रीण एका वनस्पतीवर संशोधन करते आहे परदेशात." असं कुणी सांगितलं की मुलांचा हुरूप वाढे.एकदा तर चक्क सानिकाचा मामा आला स्वतःच! नुकताच परदेश वारी करुन आला होता. भरपूर चाॅकलेटस् त्याने मुलांसमोर ओतली. एरवी सुटाबूटात वावरणारा मामाही आपल्या मूळ घराची जमिनीची बदलती रूपं पाहून इथल्या मातीच्या रंगात रंगून गेला! आई वडिलांच्या आणि बालपणीच्या आठवणीत रमला. जुन्या मित्रांना भेटला.त्यांच्यातलाच होऊन गप्पा मारू लागला. हे घर त्याला आपलंच असूनही परकं वाटत होतं ते पुन्हा आपलंच वाटू लागलं. सानिकाच्या गालावर आपल्या मातीभरल्या हातांनीच त्याने कौतुकाची बोटं रेखली तेव्हा त्याच्या डोळ्यातलं पाणी सानिकानेही क्षणात टिपलं! सीताक्काचं घर आता असं सर्वांचंच झालं होतं!

घर बांधून झालं होतंच. समोर जमीन स्वच्छ करुन मुलांनीच सारवली होती गावातनं शेण आणून! समोर छोटी बाग लावली होती. घर आता नांदतं झालं होतं आणि मुलांंना परतीचे वेध लागले होते. मामा आणि आईने आता इथे गडी ठेवायचं सहमतीने ठरवल. त्यामुळे घर
सांभाळलं जाईल आणि मुलं येतील तेव्हा त्यांना मदत पण होईल.सानिकाला आता इथे सेंद्रिय शेती करून पहायचं मनात होतं.. आपल्यासाठी.. आपल्या आनंदासाठी...

घराच्या खोलीत खणताना हे बघ काय सापडलय सानू. एक मोत्याची बुगडी आणि एक नीराजन. कुठे होत हे?"
"अग सापडलेलं असं छोटं मोठं मी एकत्र करून ठेवलं होतं. म्हटलं सगळं झाल्यावर तुला दाखवू निवांत."उन्मेष म्हणाला.
सानूने आईला फोटो पाठवलयावर तिने लगेच ओळखलं. सानू ही तर सीताक्काची बुगडी! आणि तुळशीपुढचं नीराजन"!
मुलांनी दुसर्‍या दिवशी लगेच मातीचा चौथरा केला. त्यावर कुंडीचा आकार देऊन ती रोवली.शेजारच्या वाडीतून तुळस आणवली आणि लावली. सानूने निराजन घासलं. दुकानातून तूप, वात आणली आणि तुळशीपुढे तेच नीराजन लावलं! उद्या परत निघायचं होतं. दोन महिने इथे राहिल्यावर आता अंतिम परीक्षेची तयारी आणि या प्रकल्पाचं सादरीकरण या सहाजणांना आपापल्या ठिकाणी करायचं होतं.
रात्री झोपेत तिला क्षणभर भास झाला.. दोन आजोबा आणि एक आजी या नव्या घराच्या अंगणात बसून चांदण्या मोजत गप्पा मारत आहेत.ही

Friday, 22 May 2020

Liziqi

समाजमाध्यमांमुळे एका टिचकीवर अख्खी पृथ्वीप्रदक्षिणा करता येते.हवं ते आणि नको तेही समोर येतं.यूट्यूबचा वापर करून अनेक गोष्टी पाहिल्या जातात,शिकल्या जातात,करून पाहिल्या जातात.
मला आशुतोषने एका चिनी युवतीची (Liziqi तिचं नाव)छोटी फिल्म दीडेक वर्षापूर्वी दाखवली आणि ती पाहून मी तिच्या प्रेमातच पडले.यूट्यूब चॅनल ज्यांचा असतो त्यांना त्याचा आर्थिक मोबदलाही मिळतो त्यामुळे काही बाबतीत दिखाऊपणाही असतोच त्यात.त्याला पर्याय नसला तरी मूळसूत्रमात्र लक्षात घेण्यासारख वाटतं काही विषयांच्या बाबतीत! इथेही तसंच आहे माझं.
या युवतीच्या फिल्म मला परत परत आजही पहाव्याश्या वाटतात.
मी तिची जाहिरात करते आहे असं अजिबात समजू नका कारण तो हेतूही नाही माझा.पण आपल्याला जे चांगलं समजलं असेल ते सर्वांपर्यंत पोहोचवावं हा संस्कार आईवडिलांनी लहानपणापासूनच रूजवला आहे माझ्यात.
तर ही युवती.... शहरात काहीकाळ राहून गावात परतलेली.शांत,निवांत आयुष्य जगण्यासाठी.ती आणि तिची आजी मुख्यतःआपल्याला दिसतात.
ती स्वतःचं धान्य स्वतःशेती करून पिकवते,स्वतःचे पोशाख स्वतःशिवते इतकंच काय स्वतःची सौंदर्यप्रसाधने,घरातल्या वस्तू स्वतः तयार करते. हे सर्व कौतुकास्पद वाटतंकारण ते निसर्गातील उपलब्ध गोष्टी वापरून केलेलं असतं जे तिच्या घराच्या अंगणात,शेतात वा जवळपासच्या जंगलात मिळतं!
फुलांचा वापर करुन केलेले गोड पदार्थ आणि त्याची सजावटही पाकळ्यांनीच केलेली ! पोटाआधी डोळेच तृप्त होतात.
तिच्या स्वयंपाकघरातील काम करण्याची पद्धत,घरातला नीटनेटकेपणा आणि सौंदर्यदृष्टी शिकण्यासारखी आहे.
तिने तिच्या शेतातल्या तोडून आणलेल्या शेंगा जशी नीटनेटक्या ठेवलेल्या असतात टोपलीत तशाच मलाही आता जमायला लागल्यात! उरकणं हा भाव थोडा माझाही कमी झाला ते पाहून!
त्या त्या ऋतूत जे मिळतं ते साठवून ठेवणं, त्याची बेगमी आणि व्यवस्थित केलेली योजना आपल्यालाही विचार करायला लावते.
प्रत्येक कृतीत सौंदर्यपूर्णता असणं,त्यामागे स्वतःचा नेमका विचार असणं आणि मनात जे आहे ते प्रत्यक्षात उतरविण्यासाठी केलेले सर्व प्रकारचे कष्ट असणं.. हे यातून पहायला मिळतं!
लेकसुद्धा खेळ म्हणून "ताईचा व्हीडिओ" या नावाने तिच्यासारख्या गोष्टी गंमत म्हणून करायचा प्रयत्न करते ते पाहून गंमत वाटते!
कधीतरी वेळ काढून नक्की पहा.

गजरा एक आठवण

प्रत्येकीच्या मनात गजर्‍याची एकतरी सुगंधी आठवण असते. कधी आजीने घट्ट वेण्या घालून त्यात माळलेला तर कधी मैत्रिणीने लग्नात गुंफलेला...
काल माझ्या वाडीतल्या कुंदाच्या केसात भरगच्च माळलेली अबोली पाहिली.तिला सहजंच म्हटलं "किती छान दिसतोय ग"! तर आज तिने कुणाच्यातरी हाती स्वतः पायावर तयार केलेला मोगरा आणि अबोलीचा गच्च गजरा माळून पाठवला. तिच्या अंगणातल्या फुलांचा...
ती कोण आहे?खरंतर एकाच वाडीत राहूनही ती अजून माझ्या घरापर्यत पोहोचलेली नाही. आज येते उद्या येते करत
ती अजून येतेच आहे!! पण जाता येता भेटणारी ती कधी गाई वळते तर कधी शेण्या थापते.कधी पाणी भरते तर कधी बैलांना चारा खाऊ घालताना दिसते.
कधी अंगण परस झाडताना तर कधी पाणचुलीत लाकडं सारताना...
ती माझी कोण आहे??? तसं पाहिलं तर मैत्रीणच.पण तिची माझी भेट संध्याकाळी मी बाहेर पडल्यावर होते.
पण तिची माझी जाता येताची मैत्री आज सुंदर गंधाची आठवण लेऊन आली. माझं वास्तव्य सुगंधित करून गेली.फार अपेक्षा नसते खरं नाही का आपल्याला? पण मुखवटे ल्यालेली माणसं सगळं कसं छान आहे या मुखवट्यापलीकडे खरं रूप झाकून ठेवतात आणि त्या बेगडी मुखवट्याचे भावच खरं आहेत याला आपण भुलून बसतो. तेव्हा मग अशी एखादी कुंदा परमेश्वर भेटवतो जिला काही नको आहे पण जिला सहज बोललेल्या वाक्याचा अर्थ समजून घेऊन त्यातला भाव पोचविण्याचं सामंजस्य ईश्वराने दिलं आहे!

ताम्हाणे डायरी लाॅकडाऊन..

लाॅकडाऊनच्या काळात ताम्हाण्याच्या बाहेरही पडता येत नव्हतं त्यामुळे इतर वेळी भटकायला जातो तसं यावेळी शक्य नव्हतं.कधी पन्नास किलोमीटरवरचा समुद्र,कधी एखादं मंदिर कधी कुणा परिचितांच्या घरी एवढंच काय राजापुरातल्या ठाकुर बेकरीतले माझ्या प्रचंड आवडीचे पदार्थही आता मिळू शकणार नव्हते.
पुण्यात मनात आलं की आज किंवा उद्या हा पदार्थ करुन खाऊ की जाता येता दुकानातूनसगळी सामग्री उचलता येते. ताम्हाण्यात हे मिळत नसलं म्हणजे चीज,पनीर,ब्रेड ;तरी पाचल या आठवडी बाजाराच्या गावी ते मिळतं.मग बुधवारी बाजाराच्या दिवशी आणलेल्या वस्तू रविवारपर्यंत वापरायच्या कारण या घरी ठरवून फ्रीज घेतलेला नाही.
सर्वात मोठा प्रश्न आला इंटरनेटचा. पुण्यातही मिळत नाही इतकं वेगाने इंटरनेट एरवी इथे मिळतं. पण मुंबईकर इथे अडकल्याने आणि टाॅवरचा वेग तेवढाच राहिल्याने वापर आणि पुरवठा याचं समीकरण जुळत नाही.
विकीस्र्रोताच्या अभियानात नेहमीच्या उत्साहाने भाग घेतला पण नेट नसल्याने मला जेमतेम दोन दिवस अगदीच थोडं काम करता आलं.पुण्याला आठ दिवसांनी परत जायचं असल्याने मी माझा लॅपटाॅपही आणलेला नाही.त्यामुळे माझी प्रबोधिनीची कामंही ठप्प.
मोबाईलवर बोटांनी आणि मिचमीच डोळ्यांनी किती लिहायचं असा प्रश्न मला पडायला लागला.
एकूणातच सगळ्या आघाड्यांवर काहीतरी मोठ्ठं missing होतं! हे मी आत्ता लिहिते आहे पण पोस्ट कधी होईल तेही सांगू शकत नाही कारण इंटरनेटची कृपा व्हायला हवी!
खूप चिडचिड झाली सुरुवातीला! पण एक दिवस शांतपणे विचार केला की सगळे धावत आहेत म्हणून मी पण तो अट्टहास करावा का? अनुकूलता असते तेव्हा मी ते करतेच ना! पण मग हा काळ "स्वल्पविराम" म्हणून स्वतःसाठी घोषित करुन टाकूया! परिस्थिती स्विकारली की मग त्रास कमी होईल मनाला!
भाज्या नाहीत तर उसळी करू, शेतात भरपूर वांगी आली एकदम तर एकदिवसाआड वांग्याचेच पदार्थ करून पाहू वेगवेगळे!
शेतातली कामंही लाॅकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात माणसांच्या उपलब्धतेमुळे धिम्या गतीने सुरू होती त्यामुळे मी पण निवांत दिवशी निवांत स्वयंपाक करायचे. गरमगरम वाढायचे करून पानात!
नंतर माणसं यायला लागली आणि घर व शेत गजबजून गेलं. मदतनीस दादाची दोन लेकरं खेळायला येतं तेव्हा तर घर अंगण परस म्हणजे नुसता धुमाकूळ. ही माणसं,मुलं यांना "वाचणं" हे मी या काळात केलं!
सकाळचा चहा पक्षी पहात पहात, नेट मिळालं तर त्यातलं काही स्टेटसला ठेवणे, या घरात असलेली पुस्तके वाचणे,काही नाहीतर नुसतं बसून राहणे जे मला इतक्या वर्षात कधी जमलं नाही ते यावेळी केलं!
मातीच्या ओव्हनमधे केक,बिस्कीटे करून पाहणे, मधुबनी चित्र काढायला शिकणे, पुस्टक वाच तर रोज होतंच पण इथे जरा हलकं फुलकं साहित्य वाचलं गावात ग्रंथालयात जे मिळतं ते!तरी गो.नीं.दां, रविंद्रनाथ वगैरे छान छान मिळत गेलं इथेही!
इंटरनेट मिळालं की फेबुला काही लिहिणं, मधुबनीची सरावचित्र डाऊनलोड करणं ,रेसिपी पाहून ठेवणं वगैरे उद्योग मी केले. मेल पाहणे,उत्तरे नोंदवणे आणि नेट आलं की पाठवून देणे हेही करत होते.
पण तेव्हा जाणवलं की आपण सवयीचे गुलाम झालो आहोत. अमुक तमुक नाही तर लगेच अडतं आपलं.पण या स्वल्पविरामाने मला हा निवांतपणा शिकवला.
लोक ढगात झूम मिटींग करत असताना मी नेटच्या अभावी जरासा "झूम" लू मै म्हणत वाडीत फिरत फोटो काढले. मी फिकीरच नाही केली की माझ्यामुळे काही अडतय! आपला भ्रम असतो की हे मी केलं पाहिजे आणि हे मी केलं तरच मला किती आत्मीयता आहे, गांभीर्य आहे आणि सध्या सगळं बंद असताना माझं मात्र "सगळं"सुरू आहे...वगैरे इतरांना कळेल...(हे माझं माझ्यापुरतं realization आहे) मी यातून कधीच बाहेर पडले. मला स्वल्पविराम हवा होता तो मला इंटरनेट अभावाने बहाल केला.
माणसंही कळली बरं का! माझं स्टेटस दिसलं नाही सलग दोन दिवस की कासावीस मैत्रीणींनी फोन केले की बरी आहेस ना वगैरे! मग कळलं की आपल्या फोनच्या संपर्कात नोंदवलेले किती लोक आपल्या खरोखर "संपर्कात"असतात!!!!
काही जणांनी आवर्जून आवड लक्षात घेऊन काही ना काही पाठवलं की हे पहा.. याचा आनंद घे... ही माणसंही जरा जवळची वाटली पुन्हा!
पण कधीही काहीही न नोंदवणारी माणसं आपली नसतात ती फक्त तेवढ्यापुरती गोड असतात कारण त्यांचा त्यात स्वार्थ असतो हेही कळलं.
कुणासाठी जीव तुटू द्यायचा आणि कुणासाठी नाही हे ही या विरामाने शिकवलं.
याला " पूर्णविराम" नाही.कारण नव्या साक्षात्काराची सुरुवात आहे ही ... अजून खूप गाठायचय!!!!

सई साजणी

ताम्हाण्यात मी जेव्हा संध्याकाळी ग्रंथालयातून पुस्तकं घरी घेऊन येते तेव्हा वाटेत भेटणारी महिला मला हमखास विचारते, टेंपो आलाय का? बाजार करून आलात का? मग मी खूप शांतपणे उत्तर देते की मी ग्रंथालयात गेले होते. ती जेव्हा पिशवी भर भाजीची काळजी करत असते तेव्हा माझ्या पिशवीत चार पुस्तकांचा गठ्ठा असतो. तिला पोटाची तर मला मेंदूची काळजी असते.
आमचं घर पहायला खूप माणसं येत असतात. मातीचं घर हा कुतूहलाचा विषय. त्यात आलेल्या महिला माझं मोठ्ठं स्वयंपाकघर आणि बारा फूट ओटा पाहून विचारतातच,"मॅडम तुम्हाला स्वयंपाक येतो?"
इथल्या शाळांमधल्या माझ्या उपक्रमांमुळे त्या मला जास्त ओळखतात त्यामुळे आपल्या मुलांबरोबर नाचणारी,गाणारी,गोष्ट सांजणारी मॅडम स्वयंपाक करू शकते याचं त्यांना आश्चर्य वाटतं!
मला पूर्वी खूप गंमत वाटायची. पण आता अंगवळणी पडलं. मग असा विषय झाला की मी त्यांना त्यांचा एखादा शाकाहारी पदार्थ विचारते आणि मी तो करून पाहीन असं सांगते.सहसा मऊ भात किंवा भाजी असंच काहीसं पुढे येतं कारण त्या तेच करतात. किनार्‍याजवळच्या गावांमधे असलेली पदार्थांची रेलचेल इथे तशी कमी दिसते.
या महिला दिवसभर काय करतात हे मी यावेळी जवळून पाहिलं. नेट मिळत नव्हतं त्यामुळे काम नाही मग भटका...
सकाळी घराचं अंगण,परस स्वच्छ करणं, झाडांना म्हणजे अबोली,जास्वंदी यांना पाणी घालणं,स्वयंपाकम्हणजे न्याहरी आणि दुपारच्या जेवणासाठी स्वयंपाक करणे.
या जोडीने सध्या भाजावळ झालेल्या आपापल्या खळ्यात पडलेला गळलेल्या पानांचा पातेरा झाडून स्वच्छ करणे,तो जाळणे या कामातही महिला एकत्र दिसतात.
दुपारी त्या घरातही काही करत असाव्यातही पण मला त्या चारनंतर दिसतात त्या फाटी आणताना. दुपारी त्या तोडलेल्या फांद्यांच्या नीट मोळ्या बांधण्याचे काम करताना मी पाहिलं आहे काही जणींना. पावसाळ्याची बेगमी.पाणचूल आणि चूल यासाठी लाकूडफाटा साठवून ठेवण्याची त्यांची लगबग. परवा तर शाळेच्या बाहेर पोषण आहार करणार्‍या ताई भेटल्या. त्याही शाळेच्या खिचडीसाठी लाकडं भरून ठेवत होत्या. हास्यविनोद करत आणि सध्या कोरोनाच्या गप्पा मारत त्यांची कामं सुरु असतात.
साडेपाचच्या सुमारास घरापुढे वाळत घातलेल्या गोवर्‍या एकत्र करताना त्या भेटतात. यातच धान्याचं तूस घालून पावसाळ्यात याची धुरी करतात. डास, चिलटं यावर उपाय म्हणून. आमच्या मदतनीस दादाच्या बायकोने म्हणजे विशाखाने आणि तिच्या सासूबाईंनी अशा तीन गोणी भरुन गोवर्‍या पाठवून दिल्यात. आम्ही परवा एक घेतली आणि पेटवली. व्वा मस्त आहे हे खरपूस गंध घरभर दरवळला आणि मच्छरोंकी छुट्टी! पण मला हे म्हणणं सोपं आहे कारण ते तयार करण्यामागे त्या दोघींचे कष्ट आहेत!
कंबर दुखते,पाय दुखतात अशा व्यथाही त्या मला सांगत असतात. राजापूर रत्नागिरीतून औषधंही आणत असतात.पण कष्ट थांबत नाहीत.डोक्यात माळलेल्या अबोलीच्या फुलाचा अंबाडा झुलवीत त्या हसत राहतात!काम करत राहतात.
भर दुपारी आमच्या शेतातली लाकडं मोळीत बांधताना विशाखा घामाघुम व्हायची. ती घरात आली आणि मी पंखा लावला तिच्यासाठी की ती संकोचून जायची.तिला पाण्याचा तांब्या मी हातात दिला तरी कसंतरी व्हायचं. मी तिला म्हटलं शेवटी की अग मी हे तुझं काम पाहूनच दमते आहे बाई.. तेव्हा मी तुला पाणी देणं यात काही खूप करते असं समजू नकोस.
दिवसभराच्या कष्टानंतर घरी जाऊन पुन्हा चुलीसमोर बसणे हे काम असतंच.
परवाच शेजारच्या वहिनी कुळिथ पाखडताना म्हणाल्या काही नाही तर पिठी आणि भात आहेच करायला..तेच होतय पोटभर!
या माझ्या थेट मैत्रिणी नाहीत. पण तरीही मला जवळच्या आहेत.यांच्यामुळे मला नवीन गोष्टी कळतात, गावातलं त्याचं आयुष्य कळतं आणि माझ्या कक्षा अधिक रूंदावत जातात.
मी जेव्हा दुपारच्या जेवणानंतर पुस्तक वाचत लोळत असते पंख्याखाली तेव्हा ती फाटी बांधत असते. मी पावसाचा गंध अनुभवून कविता लिहायला घेते निवांत पडवीत बसून तेव्हा वाळत घातलेल्या गोवर्‍या गोळा कहताना तिची तारांबळ उडत असते.पण तरीही तिचं आणि माझं "अंतरंग" एक आहे. फरक आहे तो बहिरंगात...

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...