Saturday, 24 November 2018

ठाकुरवाडी स्टेशन आणि त्याचा व तिचा निसर्ग


गाडी वळली.गाडी म्हणजे झुकझुकगाडी.
निसर्गाच्या अनेक छटा दाखवल्या तिने.पुणं सोडलं.पिंपरी चिंचवड तळेगाव करीत गाडी पुढे आली.कानातल्या अडकवलेल्या इयरफोन्सवर मस्त गाणी ऐकत ती दंग झाली होती.जगाचं भानच नव्हतं उरलेलं तिला.
चहा वडापाव कुरकुरे चिक्की असं काहीबाही येत होतं.पण तिचं त्यात लक्षच नव्हतं.समोरचा हळुवार निसर्ग पाहण्यात ती अक्षरशः गुंग झाली होती. तिचा सखा,तिचा निसर्ग,त्याच्यापलीकडे कुणी असू शकतं याचं तिला भानच नव्हतं.
उच्चशिक्षित.परदेशात जाऊन पोस्ट डाॅक्टरेट करून आलेली.एकुलती एक.मित्र मैत्रिणींच्या गदारोळातही लाडकी.पण तिला फक्त आणि फक्त निसर्गच आवडायचा.
गाडीतल्या गर्दीचं फारसं घेणंदेणं नव्हतं तिला. आरामदायी थंडगार डब्यातली खिडकीची जागा आरक्षित असल्याने ती आणि तिचा निसर्ग यांच्याआड कुणी नव्हतं.
ठाकुरवाडीच्या स्टेशनवर गाडीची गती जरा कमी झाली.निसर्ग पाहण्यात हरवून गेलेल्या तिला निसर्गाच्या कुशीतली माणसंही वाचायला आवडायची. त्यामुळे आत्ताही तिने तेच केलं तिच्या नकळत!! डोंगराच्या मध्यात दरीच्या अगदी कोपर्‍यावर मध्यभागी सपाट स्वच्छ केलेल्या जागी ठाकरांची पालं होती.लहानगी खेळत होती.बायाबापडे काहीबाही कामं करत होते. थंडीतल्या गारव्यात पण किंचीत सूर्यप्रकाशाच्या काहीशा उबेत काही ठाकरं दगडांवर बसली होती.हे सगळं तिने काही क्षणातच टिपलं आणि तेवढ्यात गाडी गती घेत असतानाच थंडगार डब्याचं काचेचं तावदान ढकलत तो आत आला! तिचं लक्षं नव्हतं अर्थातच पण एकदम दोन मोठ्या सॅक समोरच्या जागेवर ठेवल्या गेल्या आणि ती भानावर आली! तिने नकळत कानातले इयरफोन काढले आणि ती जरा सावरून बसली अंमळ!
त्याच्याकडे पाहून कळत होतं की हा महाशय चालत्या गाडीतच चढला आहे!!!!
तो स्थिरावेपर्यंत टीटी आले आणि हसून त्यांनी हस्तांदोलन केलं. त्याने मोबाईलवर आपलं तिकीट दाखवलं तसं टीटी म्हणाले काय मित्रा अरे!!!गाडी चुकेल पण गेले वर्षभर तू न चुकता शनिवारी येणार आणि रविवारी जाणार!! तेही आरक्षण करूनच!किती पेशंट यावेळी?
तो उत्तरला" सुदैवाने दोन छोट्यांना किरकोळ आजार आणि एक महिला गरोदर आहे पाच महिन्यांची तिची तपासणी! त्या ठाकराला सांगितलय मी की लोणावळा किंवा खंडाळ्याच्या शासकीय रुग्णालयात नेऊन आण एकदा तिला,बाकी तिची औषधं मी नेली होतीच.तसंही या निसर्गकन्या भलत्याच काटक!!
आता तिची उत्सुकता ताणली गेली. त्याने सॅकमधून एक चाॅकलेट काढलं आणि तोंडात टाकलं आणि मान टेकवून जरा निवांत होणार तोच त्याला लक्षात आलं की ती निरखून त्याच्याकडे पाहत होती. चक्क तिचा निसर्ग विसरून!!! तिच्या कमालीच्या बोलक्या चेहर्‍याचे भाव त्याला कळले आणि तो स्वतःहूनच म्हणाला तिला! हाय मी अर्चिस.डाॅ.अर्चिस सहस्रबुद्धे. एम.डी.गायनॅक. सध्या लीलावतीला आहे.!!! गेले वर्षभर ठरवून ठाकुरवाडी आणि रस्त्याची कामं करणार्‍या मंडळींना भेटायला येतो. लागतील तशी औषधं घेऊन येतो. मुलांसाठी खाऊ,खेळणी असंही जमेल तसं.अधूनमधून कारने आईबाबा पण येतात!ते ही डाॅक्टर आहेत.
मी ट्रेकरही आहे. त्याच नादात एकदा पायी आम्ही इथून जात असताना संध्याकाळी एका आजीला झोळीत घालून ही ठाकरं धावत खंडाळ्याला नेत होती.ते पाहून आम्हीही मदतीला धावलो. म्हातारीला साप चावला होता. प्रयत्न केला पण नाही वाचली!त्यानंतर ठरवलं इथे येऊन जमेल ती आणि तशी मदत करायची.नाहीतर डाॅक्टर होऊन उपयोग काय?
तिला रहावलंच नाही. पण शब्दही फुटेनात... त्याला समजलं.... गाडी हळूहळू निसर्गाची कूस सोडून सिमेंटच्या शहरात शिरायला लागली होती.आजूबाजूच्या लोकल ट्रेन्स,मुंबइची घामट गर्दी हे त्या थंडगार डब्यातही जाणवत होतं.
तो बोलत राहिला.चाॅकलेटची देवाणघेवाण झाली. मी निसर्गवेडा आहे. मित्रांच्यात रमणारा,एकुलता एक,श्रीमंत डाॅक्टर पण कष्टाळू आईवडिलांचा एकुलता एक.वरळी सीफेसवर आजोबांचं घर.ते पाडून नवीन झालेल्या टोलेजंग अपार्टमेंटमधे राहणारा!! पण निसर्ग माझं सर्वस्व आहे! या एका घटनेने जाणवलं की निसर्ग जर माझा आहे,माझं अस्तित्व इथे मला सापडतं तर इथे राहणारी ही निसर्गाची लेकरंही माझीच आहेत! त्यांच्या सुखात आपणही सुख शोधणं आणि दुःखावर फुंकर घालणं हे माझं काम आहे कारण आम्हाला जोडणारा एकच दुवा हा इथला निसर्ग!!! गाडीतून जाताना रेल्वेतून जाताना खुणावणारा घाट माझाच,श्रीवर्धन मनरंजन माझेच,रेल्वे रूळही माझेच. मंकी हीलच्या चिमुकल्या स्टेशनचा गार्ड आणि वानर कंपनीही माझीच.माझ्या निसर्गाच्या कुशीतली!!!
जमेल तितके दिवस येत राहीन.माझा आनंद आणि अस्तित्व शोधत राहीन!! अच्छा दादर येईलच आता!
ती निःशब्द,स्तब्ध! दादरला तो उतरला.खिडकीतून तिने त्याला रेल्वेचा पूल चढताना पाहिलं.....
ती छत्रपती शिवाजी टर्मिनसला उतरली!!!
विचारात बुडलेली मग्न अशी टॅक्सीत बसली आणि वाळकेश्वरच्या बंगल्यापर्यंत पोचली. माळ्याने दार उघडलं तोच आई बाहेर आली, अग मोतीराम आला होता घ्यायला.काल ठरलं नव्हतं का तसंच तुझं बाबांशी? ती एक नाही की दोन नाही!!
रात्र कशी संपली ते तिलाही कळलं नाही.अजूनही समोर रेल्वेचा डबा, समोर भरभूरन बोलणारा तो आणि अवतीभवतीची गिरीशिखरं आणि दर्‍या!!!
सोमवारी नाश्ता करून बाहेर पडली! बाराच्या सुमारास बाई लीलावतीच्या दारात हजर!!!....
आता गेले चार महिने तीही जाते त्याच्यासोबत पंधरा दिवसातून एकदा! अधूनमधून दोघांपैकी कुणाचेतरी मित्रमैत्रीण असतात सोबत!
जाताना तीच रेल्वे छत्रपती टर्मिनसवर ती पकडते.तो दादरला चढतो. कधी आरक्षण ती करते तर कधी तो. शनिवारी जाऊन रविवारी परत.
त्या गर्भवती ताईला आता सुदृढ मुलगा झाला आहे खंडाळ्याच्या इस्पितळात.अर्चिस होताच त्यावेळी! आता सर्व मंडळी मुंबईतून जाऊन पिलूचं बारसं करणार आहेत!
आणि हे सर्व पाहत आहेत रोज रुळावरून येणार्‍या जाणार्‍या झुकझुकगाडी!!!





Friday, 23 November 2018

वळण


एक वळण येतं असं बहुधा प्रत्येक नात्यात
जिथे कस लागतो माणसांचा
वळणाच्या पुढे काय खाचखळगे की सरळ रस्ता
की वाटा काट्याकुट्याच्या??
कदाचित येईल दुथडी नदी,आकंठ तृप्ती लेऊन
कदाचिते येईल  सुंदर बाग फुलापानांनी न्हाऊन!!
कदाचित येईल निळा समुद्र किनारा सोबत घेऊन
कदाचित येईल ज्वाळा विखारी ठिणगी ठिणगी बनून?
या वाटेवर हात सोडता काय होईल त्या बंधाचे?आतुरलेल्या क्षणांचे,मुसमुसणार्‍या नयनांचे??

सावळ्याचे गीत..


मनाचिया गूढगर्भी तेजाळली एक मूर्ती!
कवणा सांगू तिची किर्ती, मायबापा!!
सावळे ते रूप स्थापियले अंतरी
वसविले निरंतरी माझ्या चित्ती!!
नयनांच्या कमळांचे भाव ठसले डोळ्यात
कटेवरी हात, पाय समचरण साधिती!
उजळला देह माझा, काया जाहली पुनीत!
झाले स्थिर अवयव झळाळली बुद्धी!!
उन्मनी साधली जीव झाला एकाकार!
सावळ्याच्या परिसस्पर्शे  जीव शिव अद्वैताती !!
माझेपण रिते झाले उरली केवळ भक्ती
आसावली माझी मती तुझिया प्रिती!!
देह आणि मन बुद्धी जाहली तुझीच आता
बापरखुमादेवीवरु लागली समाधी!!





















































मनाचिया गूढगर्भी तेजाळली एक मूर्ती!
कवणा सांगू तिची किर्ती, मायबापा!!
सावळे ते रूप स्थापियले अंतरी
वसविले निरंतरी माझ्या चित्ती!!
नयनांच्या कमळांचे भाव ठसले डोळ्यात
कटेवरी हात, पाय समचरण साधिती!
उजळला देह माझा, काया जाहली पुनीत!
झाले स्थिर अवयव झळाळली बुद्धी!!
उन्मनी साधली जीव झाला एकाकार!
सावळ्याच्या परिसस्पर्शे  जीव शिव अद्वैताती !!
माझेपण रिते झाले उरली केवळ भक्ती
आसावली माझी मती तुझिया प्रिती!!
देह आणि मन बुद्धी जाहली तुझीच आता
बापरखुमादेवीवरु लागली समाधी!!





































मनाचिया गूढगर्भी तेजाळली एक मूर्ती!
कवणा सांगू तिची किर्ती, मायबापा!!
सावळे ते रूप स्थापियले अंतरी
वसविले निरंतरी माझ्या चित्ती!!
नयनांच्या कमळांचे भाव ठसले डोळ्यात
कटेवरी हात, पाय समचरण साधिती!
उजळला देह माझा, काया जाहली पुनीत!
झाले स्थिर अवयव झळाळली बुद्धी!!
उन्मनी साधली जीव झाला एकाकार!
सावळ्याच्या परिसस्पर्शे  जीव शिव अद्वैताती !!
माझेपण रिते झाले उरली केवळ भक्ती
आसावली माझी मती तुझिया प्रिती!!
देह आणि मन बुद्धी जाहली तुझीच आता
बापरखुमादेवीवरु लागली समाधी!!




















मनाचिया गूढगर्भी तेजाळली एक मूर्ती!
कवणा सांगू तिची किर्ती, मायबापा!!
सावळे ते रूप स्थापियले अंतरी
वसविले निरंतरी माझ्या चित्ती!!
नयनांच्या कमळांचे भाव ठसले डोळ्यात
कटेवरी हात, पाय समचरण साधिती!
उजळला देह माझा, काया जाहली पुनीत!
झाले स्थिर अवयव झळाळली बुद्धी!!
उन्मनी साधली जीव झाला एकाकार!
सावळ्याच्या परिसस्पर्शे  जीव शिव अद्वैताती !!
माझेपण रिते झाले उरली केवळ भक्ती
आसावली माझी मती तुझिया प्रिती!!
देह आणि मन बुद्धी जाहली तुझीच आता
बापरखुमादेवीवरु लागली समाधी!!














































































































अंतरीच्या भावनांचा पूर ये ओसंडूनी!
सुखाच्याही कल्पनेने जीव जाई गुंगूनी!!
वेदनेच्या विचाराने थरथरे मन बावरे!
कासावीस प्राण होई कसे होई शांत रे!!
मनाचिया गाभार्‍यात जळे वात तृप्तशी!
संपूनिया तीच जाई आर्त  आत तळाशी!!
हरवते या भोवर्‍यात माझे  "मी पण" तोकडे!
भावनेच्या जलाशयी उमटणारे बुडबुडे!!
मन्मनीच्या गूजगोष्टी सांगू मी कोणा आता?
तूच सारे जाणशी सृष्टीकर्त्या नियंत्या!!
कोंदलेल्या भावनांना दे आता थोडी आशा!
हीच माझी प्रार्थना तुज, दाखवी रे मज दिशा!!
आर्या.

नातं


मुखवटे लेऊन जगणं
त्याला म्हणणं तडजोड
अशाने होते का
नात्यांची सांधेजोड?
एकमेकांच्या आनंदात
परस्परांच्या दुःखात
जावे कायम सोबत
घेऊन हाती हात!!
पाठीमागे बोलणं,भेटल्यावर दुखावणं
यातूनच होत जातं मग नातं दुरावणं
जसे आहोत तसे स्वीकारूया एकमेकांना
जेणेकरून मिळेल सुंदर कोंदण आपुल्या नात्यांना
र्या

त्रिपुरी.....

आकाशातला पूर्णचंद्र तेज ओतत होता पृथ्वीवर! घरोघरी लावलेल्या कंदिलांना आणि दिव्याच्या माळांनाही त्याचा हेवाच वाटावा असाच! निसर्गाचा मनमुक्त आविष्कार!त्रिपुरवाती लावून शंकराच्या मंदिर परिसरात भाविकांची पूजा सुरु होती!कैलासराणा शिवचंद्रमौळीवर अभिषेक झाला दुधाचा.रूद्रसूक्ताने गाभारा निनादत होता. नंतर शिवाचा सुंदरसा चांदीचा बोलका भारदार मुखवटा पिंडीवर विराजमान झाला.भस्मविलेपित भोळा सांब फुलांच्या माळांनी उटीच्या गंधाने सजला. पार्वतीनेही पाहिलं असावं त्याच्या रूपाकडे निरखून!!
आकाशीच्या चांदण्याही आजच्या चद्रबिंबाकडे तशाच पाहत असतील एकटक!!
मंदिरातली लगबग वाढली. पणत्यांमधे वाती घालून,तेलाने त्या भरून भाविक मंदिर पटांगण भरून टाकू लागले.
समोरच्या व्यासपीठावर शिवाला सेवा अर्पण करीत नृत्यांगना शिवस्तुतीवर पदविन्यास करू लागल्या! त्यांच्या हालचालीही किती मोहक! नंतर साक्षात शिव अवतीर्ण झाले! डमरूचा नाद करत त्यांचं तांडव पाहण्यात भाविक तल्लीन झाले.त्यानंतर रथात बसून बालगणेश,कार्तिकेय,पार्वतीमातेसह शंकर आले आणि वाद्यांच्या तालाने वातावरण भरून गेलेले असताना त्यांनी कागदी त्रिपुरासुराचा वध केला!! डोळ्यांच्या पापण्या लवेपर्यंत क्षणात आकाश आतषबाजीने भरून गेला!  सोनेरी चांदण्या बरसू लागल्या.बालगोपाळच काय तर सर्व जमलेला प्रेक्षकवर्ग त्या आतषबाजीने हरखून गेला!!!
गर्दी पांगली.रस्ते आणि मंदिर प्रांगण मोकळं झालं... पण अजूनही...
चंद्र आकाशात होता... पणत्यांची शांत जाग मंदिरात होती. शिव प्रसन्न होता आणि एक धाकुटी त्रिपुरवात त्याच्या चरणी स्वतःला लीन करीत होती...
आर्या

Sunday, 4 November 2018


पानांवर विसावली अलगद रात्र
पहाटे झाले तिचे पारदर्शी दवबिंदू !
सागरावर उतरली अलगद रात्र
पहाटे झाल्या तिच्या सोनसळी पर्‍या लाटांवर पहुडणर्‍या!
अग्नीवर तेजाळली लखलखून रात्र
पहाटे झोपली ती त्याच्याच उबदार कुशीत रक्षा बनून!
आकाशावर पसरली रात्र शाल लपेटून अंधाराची
पहाटे सजली ती चंद्रकोर लावून कपाळी
पुढच्या सूर्यास्ताची वाट पाहण्यासाठी...
डाॅ.आर्या जोशी

एक आठवण

गवाक्षातून डोकावली चंद्राची कोर ध्यानीमनी नसताना! शरदाच्या निळाईत स्वतःला जपताना! मग लक्षात आलं की हीच तर बरसवणार आहे शरदाचं चांदणं!!पूर्ण चंद्रबिंबापर्यंतचा प्रवास कलेकलेने करत! स्वतः वाढत वाढत सगळा आसमंत उजळून टाकेल आणि सगळे प्राणिमात्रही तृप्त होतील त्या चंद्राच्या शीतल चांदण्याच्या अस्तित्वानेच!

मोठ्या खिडक्यांचं घर.....


गजांचे बंद निःशब्द अडथळे ओलंडून येईल का स्वतंत्रता या घरात?
की केवळ परंपरावादी जोखडाखालीच जगायचं आहे  इथल्या माणसांनी?
अंधुकसा दिसणारा उबदार उजेड आणेल का मनमोकळं हास्य आणि प्रामाणिक संवाद इथल्या माणसांच्यात??
नाहीतर काय होईल???
भल्या मोठ्या खिडक्यांमधून पाहणारी माणसं जगू लागतील कप्प्यात.
या कप्प्याचं गुपीत त्या कप्प्याला न सागता. पण मग हसतील या मोठ्यामोठ्या खिडक्या स्वतःशीच आणि त्याही कुजबूजू लागतील आपापसात...
असंच जगायचं होतं तर आम्हालाही द्यायचा होता थिटेपणा...
कारण जग म्हणतं.... मोठ्या खिडक्यातून जग पाहणारी माणसं मोठ्या मनाची असतात....

पार्वती की राधा



भाळी चंद्रकोर उमलली साजिरी
कृष्णाच्या चाहुलीने झाली कावरीबावरी!!
केसात मोकळ्या जडवूनी मोरपीस
तरी जीव श्रांत नाही,अजूनही कासावीस!!
मोरपीसाच्या स्पर्शे झाली वेडी मनी!
पाव्याच्या सुरांनी तिला साधली उन्मनी!!
आदिमाया आदिशक्ती जाहली हो राधा
शिव किंवा कृष्ण असो... शेवटी परमात्म्याचीच बाधा....

कोजागरी


लक्ष्मी येते विचारत को जागर्ति?
ज्ञानचक्षु उघडे ठेवून वाढविण्या बुद्धी!
घेऊन येतेच सोबत ती धन धान्य समृद्धी!
युवजनांच्या मनात रुंजी घालते प्रीती!!
सर्वांनाच भावणारा उत्सव असा रंगावा!!
दुधातल्या केशरापरी स्नेह विरघळावा!!
शरदाचं चांदणं  भरभरून अनुभवावं!
तेजोमय वाटांनी जीवन उजळून जावं!!
र्या

आली दीपावली


यक्षरात्री म्हणूनिया, हीचा हो लौकिक
याच उत्सवाचे, मनामनात कौतुक!!
तेजाळले दीप, आनंदजल प्रवाही!
पाच दिसांची दिवाळी, आहे अर्थवाही!!
वसुबारसेची संध्या, कृषीवलांचा उत्सव
गाय वासराच्या प्रती, धन्याचा स्नेहभाव!!
धनत्रयोदशी सजली, धनांच्या राशीने
अलांछन व्यापार, करू निर्मळ मनाने!!
असुराचा वध करूनी, गेला हो श्रीकृष्ण
स्रीजातीच्या उद्धाराचे, त्याच्या मनी होते भान!!
लक्ष्मीचे पूजन ,गृहलक्ष्मी आत्मतृप्त!
दोघींच्याही हास्यातून, येई घरात आनंद!!
वामन अवतारे केला, गर्वनाश बळीचा!
दिवस साजिरा ,पती पत्नीच्या प्रेमाचा!!
आली भाऊबीज, भावा बहिणीची प्रीत
वात्सल्याला आदराची ,जोडूनिया रीत!!
कंदील दाराशी, झुलतो सांजेला
मंगलाला हाक देतो, आतुर संध्येला!!
गंधित उटणे, सुशोभित करी अंग!
शरीर मनाचे ,शुद्ध होई अंतरंग!!
फटाक्यांनी भरले , आकाश साजिरे!
बालगोपाळांच्या हास्ये, क्षण आनंदाने भरे!!
अशी ही दिवाळी आनंद हर्ष मोद
ईशाच्या कृपेने आशीर्वाद होवो प्राप्त!!
र्या

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...