Saturday, 1 September 2018

कृष्ण

देवकीचा पुत्र यशोदेच्या कुशी
आनंद जाहला गोपमनी!
गोकुळात भरले लीलांचे मेळे
बाळकृष्ण खेळे नंदाघरी!!
लोण्याने माखली बाळांची मुखे
तृप्तीचे दोहन घरोघरी!
कंस आणि कालिया दुर्जनांचा वध
नाशियला गर्व  इंद्रदेवाचा!
राधेचे प्रेम सोज्वळ श्यामल
गेले शिकवून तत्वज्ञान!
रास रचियली वृंदावनात
राखूनिया मान गोपिकांचा!
अर्जुनाचा सखा, सत्याचा आधार
गेला सांगून कर्मयोग!
अशा त्याच्या लीला असे त्याचे जिणे
तरीही उरला दशांगुळे!!
आर्या

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...