नेहमी आपलं गार्हाणं देवाला सांगायला भक्त देवळात जातो पण या सणाला मात्र देव प्रत्येकाच्या घराघरात जाऊन भक्ताची चौकशी करतो. भक्त आणि भगवंत यातला हा आत्मीय संवाद अनुभवायचा तर कोकणातल्या कोणत्या तरी एका खेड्यात शिमगोत्सवाला नक्की भेट द्यायला हवीच!
कोकणातल्या आमच्या गावच्या वाड्या बारा! त्यातल्या एका वाडीची ब्रिटीश काळातली जुनी हकीकत आहे,नक्की काय ते कुणालाच माहिती नाही पण या वाडीत देवाची पालखी जात नाही हे मात्र जुने जाणते गावकरी सांगतात. या वाडीचा अपवाद सोडला तर बाकी प्रत्येक वाडीत घरी देवीची पालखी वाजतगाजत जाते!
नोकरीधंद्यानिमित्त गावाबाहेर गेलेले कुटुंबीयही या उत्सवाला आवर्जून आपल्या मूळ घरी येतात.
फाल्गुन पौर्णिमेला होळीच्या मांडावर होम लावला जातो. मांड म्हणजे असा चौथरा जिथे रोज रात्री पालखी विसाव्याला येते.देवळातून पंधरा दिवस बाहेर पडलेले देवी देवता सोन्याने मढून गावात फिरतात,भक्तांना भेटून थकतात आणि भक्तांच्या सुरक्षित छायेत मांडावर रात्री विसावा घेतात! जसा मी तसा माझा देव... नाही का??
होळीच्या दिवशी मानकरी खोतांच्या घरी प्रथम पालखी जाते. शेणाने सारवलेलं ,रांगोळीच्या बोटांनी भरलेलं अंगण,अबोली,सुरंगीने सजलेले हार असा सगळा थाट! बाहेरच्या पडवीत किंवा ओसरीवर नक्षीदार गालिचा,त्याशेजारी तेवती समई देवीच्या स्वागताला सज्ज असते.दाराला तोरण, कमानी,कनाती यांनी मांगल्य आणखीनच वाढतं!
रोज शेतात,बैलजोडीच्या साथीने राबलेले हात आज कांकणं भरून पावतात! नाकात नथ,अंबाड्यावर वेणी,नाकात नथ,अशी धनीण सजते. रोजच्या मळक्या मातीतल्या कपड्यातला घरधनीसुद्धा आज ओळखू येत नाहीत आपल्याला! लेकराबाळींचं तर विचारूच नका काही!
घराघरात गुळाच्या ढेपी येऊन पडतात! पालखीसोबत येणारा गावकर आणि भक्तांना प्रसाद वाटण्यासाठी हागूळ असतो! पालखी आपल्या वाडीत यायच्या आदल्या दिवशी स्वयंपाकाची तयारी होते.चूली सारवल्या जातात.कुंकवाची बोटं रेखली जातात.
मांडावरही लगबग असतेच! होलदेव नावाचा पाषाणाचा देव गुरवाकडून रोज पूजला जातो. मांडावरच्या बहरू लागलेल्या चाफ्यानेच तोही शोभून दिसतो!
सकाळी मांडावर ओट्या भरल्या जातात.कुणाचा नवस पूर्ण झाला तर त्याचं कथन गुरव देवाला करतो. कुणी नवा नवस बोलतो. कुणी नारळ देतं कुणी काही! तर तेही देवाला सांगितलं जातं. सुखा समाधानाची प्रार्थना केली जाते.
ज्या वाडीत पहिल्या घरी पालखी जाणार ते यजमान देवाला न्यायला जातात. ढोल ताशा फटाक्यांच्या गजरात देवी नव्या उत्साहाने निघते. घरोघरी पालखीच्या चार पायांना पाणी लावलं जातं. पालखी मध्यभागी विसावते गालिच्यावर, औक्षण होतं.ओट्या भरल्या जातात. देवीचं तोंड गोड केलं जातं.
सर्वांना गूळ वाटला जातो. गावकर गजर करून मोठ्याने यजमानाचं नाव घेऊन .... अमुक अमुक यांची पूजा स्वीकार कर असे देवाला विनवतो. पाठोपाठ खेळे तयारच असतात! गोमू,सोंगं हा शेतकरी वर्गाचा आवडता मनोरंजनाचा उद्योग! पंधरा दिवस पालखी पाठोपाठ जाऊन लहान मुलं गाणी म्हणतात.पुरुष माणसं महिलेचा वेश परिधान करुन गोमू होते.विशिष्ट लयबद्ध हातापावलांच्या हालचाली करत नाच होतो. यानंतर पोस म्हणजे खेळाबद्दल पैसे मागितले जातात.
पालखी नाचविणे हा कोकणातला विशेष. गोलाकार फिरत,पालखीचे खांदेकरी जलद गतीने बदलले जातात.ढोल ताशाच्या तालावर पालखीही नाचते. काहीवेळा पालखी डोक्यावर घेऊनही नाचवली जाते.हे एका घरी झालं की पुढच्या घरचे यजमान देवाला आणायला आधीच्या घरी जातात.तिथे पुन्हा हाच क्रम!
हा आनंदसोहळा वाडीतल्या प्रत्येक घरात होतौ.
घराघरात जेवणावळी होतात.रोजच्या शेतीच्या कामातून एकमेकांकडे लांब लांब वाड्यात जायला वेळ होत नाही त्यामुळे यानिमित्ताने एकमेकांना आवर्जून प्रसादासाठी बोलावलं जातंच!
एखाद्या दिवशी मांडाच्या जवळपासच्या वाडीत महिला,मुली नटून थटून पालखीभोवती लेझीमचा फेर धरतात!सगळं गाव रात्रभर नाचत राहतं असं!
रोज पालखी मांडावर आली की मांडाला प्रदक्षिणा घातली जाते. होलदेवाच्या समोर गुरव गवताचा चूड पोटवतो, बोंब ठोकली जाते आणि अर्धा मूर्धा जळलेला चूड क्षणात झाडाच्या वाळलेल्या फांदीने झटकून शांत केला जातो.
या आनंद सोहळ्याची सांगता रोमट या जत्रेने होते. मांडाभोवती दुकाने लागतात.नाटुकली सादर होतात. पालखी नाचते. उत्साह आता शिगेला पोहोचलेला असतो.
भक्तांना भेटून तृप्त झालेली देवी पुन्हा हेदृश्य डोळ्यात साठवून मंदिरात जाऊन विसावते... पुढच्या शिमग्याचीवाट पाहत!