खरं तर तू येणार होतासच!
ढगांनी रंगमंचही सजवला होता,
पण तू थांबला होतास वार्याच्या इशार्यासाठी!
तो तुझा सांगाती,तुझ्यासारखाच!
पाहत होतात तुम्ही आसुसलेल्या तिला,योजनगंधा होण्यासाठी!
पण तुम्हीही निसर्गाच्याच आधीन नं!
शेवटी पडघम वाजले,म्हातारीने दळण सुरु केलं आणि तू आलास अखेरीस!
पण काय हे बरसणं! हसून सामोरं येण्याऐवजी वीजकल्लोळ घेऊनच कोसळणं!!
तीही खुलली,उमलली,योजनगंधा झाली!!
मनामनांना पालवत, सुखावत थेंबाथेंबाने मोहरली!!
पण काय हे विभ्रम तुमचेही!
तू, तुझा वारा आणि तुझी धरित्री!
तुमचे संकेत तुम्हीच जाणणारे
आम्ही मर्त्य मानव इथे पाहत असतो वाट तुमच्या या नाट्याची!
कारण माहिती असतं आम्हालाही की हे केवळ नाट्य नाही तर ती आहे अनुभूती शाश्वत निर्मितीची,अंकुरणार्या कोंबांची आणि सृजनाच्या सोहळ्यात स्वतःलाही विसरायला लावणारी अत्तराच्या कुपीची!!
आर्या.

No comments:
Post a Comment