स्वप्नभरल्या डोळ्यात नीज उतरली होती.हळूहळू ती नीज तिला स्वप्नांच्या राज्यात घेऊन गेली.एक उमदा युवक तिथे सामोरा आला.मऊमऊ बिछान्यावर एक शुभ्र मखमली पोशाख, सुंदरशा दोन अंगठ्या,स्वप्रांसारखाच गंधित पुष्पगुच्छ, आणि सामावलेली नाजूकशी डबी!!
आश्रमाची पहाटेची घंटा झाली आणि तिला जाग आली.आज तिचा साखरपुडा होणार होता.आदिवासी आश्रमशाळेत राहून शिकलेल्या आणि जगाला शिकवण्याची इच्छा असलेल्या त्या युवतीला एक सुशिक्षित युवक आज त्याच्याआयुष्याची सहचरी म्हणून स्वीकारणार होता.
आर्या जोशी

No comments:
Post a Comment