गजांचे बंद निःशब्द अडथळे ओलंडून येईल का स्वतंत्रता या घरात?
की केवळ परंपरावादी जोखडाखालीच जगायचं आहे इथल्या माणसांनी?
अंधुकसा दिसणारा उबदार उजेड आणेल का मनमोकळं हास्य आणि प्रामाणिक संवाद इथल्या माणसांच्यात??
नाहीतर काय होईल???
भल्या मोठ्या खिडक्यांमधून पाहणारी माणसं जगू लागतील कप्प्यात.
या कप्प्याचं गुपीत त्या कप्प्याला न सांगता. पण मग हसतील या मोठ्यामोठ्या खिडक्या स्वतःशीच आणि त्याही कुजबूजू लागतील आपापसात...
असंच जगायचं होतं तर आम्हालाही द्यायचा होता थिटेपणा...
कारण जग म्हणतं.... मोठ्या खिडक्यातून जग पाहणारी माणसं मोठ्या मनाची असतात....

No comments:
Post a Comment