अंतरीच्या भावनांचा पूर ये ओसंडूनी!
सुखाच्याही कल्पनेने जीव जाई गुंगूनी!!
वेदनेच्या विचाराने थरथरे मन बावरे!
कासावीस प्राण होई कसे होई शांत रे!!
मनाचिया गाभार्यात जळे वात तृप्तशी!
संपूनिया तीच जाई आर्त आत तळाशी!!
हरवते या भोवर्यात माझे "मी पण" तोकडे!
भावनेच्या जलाशयी उमटणारे बुडबुडे!!
मन्मनीच्या गूजगोष्टी सांगू मी कोणा आता?
तूच सारे जाणशी सृष्टीकर्त्या नियंत्या!!
कोंदलेल्या भावनांना दे आता थोडी आशा!
हीच माझी प्रार्थना तुज, दाखवी रे मज दिशा!!
आर्या.
सुखाच्याही कल्पनेने जीव जाई गुंगूनी!!
वेदनेच्या विचाराने थरथरे मन बावरे!
कासावीस प्राण होई कसे होई शांत रे!!
मनाचिया गाभार्यात जळे वात तृप्तशी!
संपूनिया तीच जाई आर्त आत तळाशी!!
हरवते या भोवर्यात माझे "मी पण" तोकडे!
भावनेच्या जलाशयी उमटणारे बुडबुडे!!
मन्मनीच्या गूजगोष्टी सांगू मी कोणा आता?
तूच सारे जाणशी सृष्टीकर्त्या नियंत्या!!
कोंदलेल्या भावनांना दे आता थोडी आशा!
हीच माझी प्रार्थना तुज, दाखवी रे मज दिशा!!
आर्या.
No comments:
Post a Comment