मुग्धाचा बाबा निसर्गवेडा. बाबाने पुण्याजवळच्या एका छोट्या गावात शेतजमीन विकत घेतली आणि तिथे शेती करायचं ठरवलं.आपाल्या कामांचे व्याप सांभाळून शेतीचाही आनंद घेणं,मुग्धाला खुला मोकळा निसर्ग वाचायला शिकवणं असा त्यांचा हेतू होता.
शेतात रहायला घरही हवंच नं! पण बाबा म्हणालं की आपण निसर्गपूरक मातीचं घर बांधूया. मुग्धाची मावशी आर्किटेक्ट होती.तशीच निसर्गप्रेमी. मातीची घरं बांधायचं शिक्षण तिने आवर्जून घेतलं होतं. मग काय... मस्त टीम जमली आणि मुग्धाच्या शेतात मातीच्या घराचं काम सुरु झालं.
आता मातीची घरं बांधायची तंत्र लोक विसरले आहेत.सगळे सिमेंट किंवा चिरा वापरतात. पण मुग्धाच्या नव्या गावात राहणारा बंकाराम तयार झाला नवं तंत्र शिकायला!
मुग्धाला तसंही मातीत खेळायला प्रचंड आवडायचंच त्यामुळे तिची तर चंगळच होती. दिवाळीच्या सुट्टीत मावशीबरोबर दर दोन दिवसाआड मुग्धा एस.टी.ने जाऊ लागली कोतापूरला. तसं तासाभराचंच अंतर.पण बाबाच्या गाडीखेरीज आणि शाळेच्या व्हॅनखेरीज दुसर्या कुठल्याच वाहनात न बसलेली मुग्धा या प्रवासाची मजा घेऊ लागली. मुग्धाला कंडक्टर काका आणि प्रवाशांची भांडणं एकताना पण गंमत वाटू लागली.
बंकाराम काका आणि त्याची गावातली ओळखीची काका,मावशा मंडळी रोज येऊ लागली. मुग्धाही आता त्या प्रक्रियेचा आनंद घेऊ लागली.
मावशीच्या सूचनेप्रमाणे माती कालवून त्याच्या विटा पाडणं,त्या सूर्यप्रकाशात वाळवणं या सर्व कामात मुग्धाही बरबटून जायची.पण ती जामच खुश होती... सगळ्या काका मावशांच्यात बसून त्यांच्या शिदोरीतली भाजी भाकरी खायला मुग्धा इथेच शिकली... झणझणीत रस्सा आणि कोरडीशी भाकरी, काहीवेळा ठेचाही.
विटा पाडून झाल्या आणि मावशीने भिंती चढवायला घेतल्या. मापं कशी घेतात, विटा कशा रचतात, त्यांच्यामधे मातीच कशी लिंपतात हे पाहून पाहून मुग्धाही ते लीलया करायला शिकली. आईने आणि मुग्धाने शेण आणि मातीच्या ओल्या मिश्रणाने घराच्या भिंतीही लिंपल्या!घरच्यांच्याच काय तर गावकर्यांच्याही कौतुकाचा विषय झाली!बाबाही रोजच्या कामातून वेळ काढून येई तेव्हा तोही घराचं काही ना काही काम करीत असे.
आता दरवाजाच्या आणि खिडक्यांच्या चौकटी तयार होऊन आल्या. सुतारकाकांची धांदल पाहत मुग्धाही ती हत्यारं काळजीपूर्वक हाताळू लागली. रंधा मारून पडलेला गोलगोल भुसा तिने आईबरोबर बसून रंगवला आणि काड्या लावून फुलदाणीत ठेवला!
खिडक्यांच्या चौकटीला कडू तेल लावायचं होतं.मुग्धा ऐटीत ब्रश घेऊन बसे आणि लाकडाला तेल लावी. तेल पिऊन तुकतुकीत झालेलं लाकूड पहायला तिला मस्त वाटे.
मातीचा किल्ला करणं, मातीची भांडी करणं, लाकडाच्या वाया गेलेल्या उरलेल्या ठोकळ्यांना चिकटवून रंगवणं या उद्योगाने मुग्धाची पुण्यातली खोलीही भरुन गेली. दिवाळी सुट्टी संपून शाळा सुरु झाली तरी मुग्धाबाई चक्क दांड्या मारून कोतापूरला पळायच्या.आई बाबांनीही तिला हे स्वातंत्र्य दिलं कारण त्यातून मुग्धा खूप नव्या गोष्टी शिकत होती मोकळ्या निसर्गात... ज्या तिला शाळेच्या चार भिंतीत शिकायला मिळाल्या नसत्या....
पाचवीतली मुग्धा मावशीसारखाच कागदावर घराचा आराखडा काढायला शिकली.घराच्या छपराची रचना कामगारांना दाखवायला मावशीने पुठ्ठ्याचं घर केलं त्यातही मुग्धा मॅडम लुडबुडल्या.
हळूहळू घराने आकार घेतला. बांबूचं छत तयार करण्यासाठी भोरला बांबू पहायलाही मुग्धा गेली आणि तिथल्या काकांकडून तिने बांबूविषयी माहितीही मिळवली. त्यावर्षी शाळेचा प्रकल्प तिने बांबू या विषयावरच केला!

पावसाळ्याच्या तोंडावर काजव्यांनी लखलखणारं आपल्या शेतातलं झाड पाहून ती नाचायलाच लागली!!विंचू, साप,बेडूक यांच्याशीही तिची ओळख होऊ लागली...
मितालीताईच्या लग्नात आजी गंमतीने मुग्धाला म्हणाली की मुग्धा पहा बरं... लग्न केलं की नवर्याच्या घरी रहायला जावं लागतं...
त्यावर मुग्धाबाई टेचात म्हणाल्या.,. मुळीच नाही... मी लग्न करणारच नाही... आणि केलं तरी माझा नवरा "माझ्या" घरी रहायला येईल कोतापूरला... कारण माझं ते घर "मीच" बांधलं आहे नं???
No comments:
Post a Comment