संकासुर...
प्रवास एका असुराचा देवत्वाकडे
भारतीय संस्कृती समृद्ध आहे.अंगोपांगाने नटली आहे.
भारताच्या कानाकोपर्यात रुजली आहेत या संस्कृतीची पाळंमुळं आणि त्यावर तरारल्या अनेक पिढ्या.
मला असाच भेटला एक राक्षस...
मला राक्षस भेटावा यात आशुतोषला काही विशेष वाटलं नाही. पण मी तर चक्क प्रेमात पडले या असुराच्या.
मला या असुराच्या प्रेमात पडायला निमित्त झाले धनंजय सर आणि डाॅ.मीनलताई मेहेंदळे. मेहेंदळे मोशन पिक्चर्स च्या निर्मितीमधे संकासुरमधे मी सहभागी झाले नव्हे धनंजय सरांनी मला सहभागी करून घेतलं विश्वासाने.
मी ऐकलेलं वाचलेलं संशोधनातून शोधलेलं खूप काही माझ्या गाठीशी आहे.माझी मराठी भाषाही थोडी संस्कृतप्रचुर आहे पण असं असतानाही मी हा छोटा प्रयत्न केला.
तर आता माझी प्रेमकथा...
एक असुर.... त्याच्या विविध आख्यायिका...
आख्यायिकाच त्या... पण थोडा तथ्यांश किंवा अन्वयार्थ नक्की असावा त्यात.
लोकांना ज्ञानाचे दरवाजे खुले करून देणारा या अर्थाची संकासुराची आख्यायिका मी वाचली आणि fall in love झालं माझं.
कठीण असतं नं किती बहुजनमनाला ज्ञानाची कवाडं खुली करून देणं.. पण तरी तो असुर होता म्हणे..
लोककलेच्या अंगाने ही संकल्पना जोपासणारा कोकणी कलाकार तितकाच वंदनीय आहे. आणि या सर्वासाठी पायपीट करणारे आणि डोळ्यांना उत्तम भासणारं प्रेक्षकांना अधिक उत्तम करुन दाखवणारे धनंजय सर आणि ओंकार यांचंही कौतुक.
चर्चा,गप्पा,जेवण,चहाचे कप रिचवणे आणि खाऊ खात खात पाहिलेला संकासुर.
मला तर ती फ्रेम पक्की डोक्यात ठसली आहे...
वाद्याच्या घुमारेदार आवाजात नाचणारा संकासुर एका क्षणी screen वर ठाशीव दिसतो...... नजरेत भरतो!मनात उतरतो.... ठाव घेतो.
आपली टोपी मुखवटा शेवटच्या दिवशी देवीसमोर संकासुर उतरवतो खरा... पण माझ्या मनात मात्र तो आजही नाचतोच आहे... आवर्तांच्या घुमावात.... मनामनात..,, संस्कृतीच्या जपणुकीत... त्याच्याही नकळत.
आर्या.
Tuesday, 8 January 2019
संकासुर
Subscribe to:
Post Comments (Atom)
राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.
राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू. प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी छत्रपती शिवाजी महाराजांचे ...
-
राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू. प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी छत्रपती शिवाजी महाराजांचे ...
-
उदो बोला उदो ! डॉ. आर्या आशुतोष जोशी शरद ऋतूचा मन प्रफुल्लित करणारा अनुभव देत देत घटात विराजमान होते आदिमाया, जगज्जननी ! नऊ रा...
-
मनात विचारांचं काहुर पेटवत ती क्षितीजावर रेंगाळत राहिली.... तिची छाया परिसरात आणि मनातही पसरू लागली..... क्षितीजावर तिच्या गुलाबी झाकेचे वि...
No comments:
Post a Comment