घेऊन जाशील सखया मजला पुनश्च एका सायंकाळी
गिरीकुहरांच्या रांगेत उमलत होती तेथे नवी नव्हाळी
फुलली होती अग्निशिखा वेचली मी होती तुझ्यासवे
तुझ्या माझिया अस्तित्वाचे दृश्य तेच बरवे
सांजभूल की पडू लागली भवताली चहूकडे
पायवाटा हरवून गेल्या जिथे अपुले पाऊल पडे!
कोण एक सुंदरशी दिसली अवचित वाट
तुझिया हाती धरूनी चढले सोडुनिया रीतभात
नव्हते तेथे तुजवीण कोणी मजसोबत तेव्हातरी
क्षणिकही नव्हती उमटूनी गेली भीती मनमंदिरी
त्या वाटेने वरती जाता होती सुंदर शिळा
डोंगरसुळके आणिक शिखरे पाहत होती तिला
भणाणलेला वारा पिऊनी तृप्त जाहलो मनी
माझी सुरेल सुरावटही पडली तुझिया कानी
गभस्ती आता घरी परतला दाटू लागला अंधार
तेव्हा मीही आळवित होते तुझ्यासवे गंधार
अथांग नभ मी तिथून पाहिले झाले मनबावरी
तुझिया बोलातून मी ऐकली कृष्णाची पावरी
त्याचक्षणी माझिया मनाचा शोध बरे संपला
अथांग नभाने मलाच माझा जीवनसाथी दिला.
वाटे आता परतूनी जाऊ पुन्हा आपण तिथे
बसू त्याच शिळेवर कारण जीवन नाही थिटे
आता पाहू स्वप्ने आणिक वारा पुन्हा पिऊ
तुलाच मी अन् मलाच तू हे नक्की ठरवू
संध्याछाया बांधतील माझी गाठ तुझ्याशी पुन्हा
त्याचवेळी फिरूनी वाजवील पावा गोकुळी कान्हा!
आर्या.
Monday, 11 March 2019
आठवण एका संध्येची
Subscribe to:
Post Comments (Atom)
राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.
राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू. प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी छत्रपती शिवाजी महाराजांचे ...
-
राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू. प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी छत्रपती शिवाजी महाराजांचे ...
-
उदो बोला उदो ! डॉ. आर्या आशुतोष जोशी शरद ऋतूचा मन प्रफुल्लित करणारा अनुभव देत देत घटात विराजमान होते आदिमाया, जगज्जननी ! नऊ रा...
-
मनात विचारांचं काहुर पेटवत ती क्षितीजावर रेंगाळत राहिली.... तिची छाया परिसरात आणि मनातही पसरू लागली..... क्षितीजावर तिच्या गुलाबी झाकेचे वि...
No comments:
Post a Comment