#एक कोपरा
एक कोपरा मनाचा
हळवा तुझ्याचसाठी
एक कोपरा आकाशाचा
आतुर चंद्रबिंबासाठी!
एक कोपरा अंगणाचा...
बहरलेल्या मोगर्यासाठी!
एक कोपरा रस्त्यावरचा
हक्काच्या गप्पांसाठी!
एक कोपरा शेतामधला
चिमणचारा टिपण्यासाठी!
एक कोपरा सागराचा
लाटेला थबकण्यासाठी!
एक कोपरा भग्न भिंतीत
पिंपळफांदी सावरण्यासाठी!
एक कोपरा वर्तमानाचा
भूत भविष्य जोडण्यासाठी!
एक कोपरा कागदावरचा
कवितेखालील चित्रासाठी!!
Monday, 1 April 2019
एक कोपरा
Subscribe to:
Post Comments (Atom)
राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.
राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू. प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी छत्रपती शिवाजी महाराजांचे ...
-
राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू. प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी छत्रपती शिवाजी महाराजांचे ...
-
उदो बोला उदो ! डॉ. आर्या आशुतोष जोशी शरद ऋतूचा मन प्रफुल्लित करणारा अनुभव देत देत घटात विराजमान होते आदिमाया, जगज्जननी ! नऊ रा...
-
मनात विचारांचं काहुर पेटवत ती क्षितीजावर रेंगाळत राहिली.... तिची छाया परिसरात आणि मनातही पसरू लागली..... क्षितीजावर तिच्या गुलाबी झाकेचे वि...
No comments:
Post a Comment