कसं सांगू तुला
कासावीस मन
किती वाट पहावी
कीरमिजी शाल पांघरून!
कुठे असशी तू
कूस पालटून
केवड्याच्या गंधाला
कैफात लपेटून!
कोणते ते रूप
कौतुकची गावे
कंठमणी सुरेख
तुला न्याहाळावे!
कसे सांगू तुला
कीर्ती भक्तीची
आस संपतच नाही
तुझ्या मुरलीची!
कासावीस मन
किती वाट पहावी
कीरमिजी शाल पांघरून!
कुठे असशी तू
कूस पालटून
केवड्याच्या गंधाला
कैफात लपेटून!
कोणते ते रूप
कौतुकची गावे
कंठमणी सुरेख
तुला न्याहाळावे!
कसे सांगू तुला
कीर्ती भक्तीची
आस संपतच नाही
तुझ्या मुरलीची!
No comments:
Post a Comment