दयाळ उठला भल्या सकाळी
शीळ मधुर त्याने घातली
झाडे जागी होऊ लागली
लगबग आता सुरू झाली!
अजून पाने स्तब्धच होती
हिरवी स्वप्नं पहात होती
वाऱ्यानेही अजून पुरती
पहाट चादर काढली नव्हती!
छोटी पाने चुळबूळ करती
डोळे किलीकिल करत पाहती
मोठी पाने आळस देती
वृक्षाई गोंजारत होती
दवबिंदूंनी अंघोळ घातली
पाने तजेलदार झाली
अंगावरती धुकं माखून
पाने आता सजून बसली
आला सूर्य क्षितिजावर
पाने करती नमस्कार
झाडे डुलती वाऱ्यावर
दिवस आला भरभर वर!
शीळ मधुर त्याने घातली
झाडे जागी होऊ लागली
लगबग आता सुरू झाली!
अजून पाने स्तब्धच होती
हिरवी स्वप्नं पहात होती
वाऱ्यानेही अजून पुरती
पहाट चादर काढली नव्हती!
छोटी पाने चुळबूळ करती
डोळे किलीकिल करत पाहती
मोठी पाने आळस देती
वृक्षाई गोंजारत होती
दवबिंदूंनी अंघोळ घातली
पाने तजेलदार झाली
अंगावरती धुकं माखून
पाने आता सजून बसली
आला सूर्य क्षितिजावर
पाने करती नमस्कार
झाडे डुलती वाऱ्यावर
दिवस आला भरभर वर!
No comments:
Post a Comment