ताम्हाण्यात मी जेव्हा संध्याकाळी ग्रंथालयातून पुस्तकं घरी घेऊन येते तेव्हा वाटेत भेटणारी महिला मला हमखास विचारते, टेंपो आलाय का? बाजार करून आलात का? मग मी खूप शांतपणे उत्तर देते की मी ग्रंथालयात गेले होते. ती जेव्हा पिशवी भर भाजीची काळजी करत असते तेव्हा माझ्या पिशवीत चार पुस्तकांचा गठ्ठा असतो. तिला पोटाची तर मला मेंदूची काळजी असते.
आमचं घर पहायला खूप माणसं येत असतात. मातीचं घर हा कुतूहलाचा विषय. त्यात आलेल्या महिला माझं मोठ्ठं स्वयंपाकघर आणि बारा फूट ओटा पाहून विचारतातच,"मॅडम तुम्हाला स्वयंपाक येतो?"
इथल्या शाळांमधल्या माझ्या उपक्रमांमुळे त्या मला जास्त ओळखतात त्यामुळे आपल्या मुलांबरोबर नाचणारी,गाणारी,गोष्ट सांजणारी मॅडम स्वयंपाक करू शकते याचं त्यांना आश्चर्य वाटतं!
मला पूर्वी खूप गंमत वाटायची. पण आता अंगवळणी पडलं. मग असा विषय झाला की मी त्यांना त्यांचा एखादा शाकाहारी पदार्थ विचारते आणि मी तो करून पाहीन असं सांगते.सहसा मऊ भात किंवा भाजी असंच काहीसं पुढे येतं कारण त्या तेच करतात. किनार्याजवळच्या गावांमधे असलेली पदार्थांची रेलचेल इथे तशी कमी दिसते.
या महिला दिवसभर काय करतात हे मी यावेळी जवळून पाहिलं. नेट मिळत नव्हतं त्यामुळे काम नाही मग भटका...
सकाळी घराचं अंगण,परस स्वच्छ करणं, झाडांना म्हणजे अबोली,जास्वंदी यांना पाणी घालणं,स्वयंपाकम्हणजे न्याहरी आणि दुपारच्या जेवणासाठी स्वयंपाक करणे.
या जोडीने सध्या भाजावळ झालेल्या आपापल्या खळ्यात पडलेला गळलेल्या पानांचा पातेरा झाडून स्वच्छ करणे,तो जाळणे या कामातही महिला एकत्र दिसतात.
दुपारी त्या घरातही काही करत असाव्यातही पण मला त्या चारनंतर दिसतात त्या फाटी आणताना. दुपारी त्या तोडलेल्या फांद्यांच्या नीट मोळ्या बांधण्याचे काम करताना मी पाहिलं आहे काही जणींना. पावसाळ्याची बेगमी.पाणचूल आणि चूल यासाठी लाकूडफाटा साठवून ठेवण्याची त्यांची लगबग. परवा तर शाळेच्या बाहेर पोषण आहार करणार्या ताई भेटल्या. त्याही शाळेच्या खिचडीसाठी लाकडं भरून ठेवत होत्या. हास्यविनोद करत आणि सध्या कोरोनाच्या गप्पा मारत त्यांची कामं सुरु असतात.
साडेपाचच्या सुमारास घरापुढे वाळत घातलेल्या गोवर्या एकत्र करताना त्या भेटतात. यातच धान्याचं तूस घालून पावसाळ्यात याची धुरी करतात. डास, चिलटं यावर उपाय म्हणून. आमच्या मदतनीस दादाच्या बायकोने म्हणजे विशाखाने आणि तिच्या सासूबाईंनी अशा तीन गोणी भरुन गोवर्या पाठवून दिल्यात. आम्ही परवा एक घेतली आणि पेटवली. व्वा मस्त आहे हे खरपूस गंध घरभर दरवळला आणि मच्छरोंकी छुट्टी! पण मला हे म्हणणं सोपं आहे कारण ते तयार करण्यामागे त्या दोघींचे कष्ट आहेत!
कंबर दुखते,पाय दुखतात अशा व्यथाही त्या मला सांगत असतात. राजापूर रत्नागिरीतून औषधंही आणत असतात.पण कष्ट थांबत नाहीत.डोक्यात माळलेल्या अबोलीच्या फुलाचा अंबाडा झुलवीत त्या हसत राहतात!काम करत राहतात.
भर दुपारी आमच्या शेतातली लाकडं मोळीत बांधताना विशाखा घामाघुम व्हायची. ती घरात आली आणि मी पंखा लावला तिच्यासाठी की ती संकोचून जायची.तिला पाण्याचा तांब्या मी हातात दिला तरी कसंतरी व्हायचं. मी तिला म्हटलं शेवटी की अग मी हे तुझं काम पाहूनच दमते आहे बाई.. तेव्हा मी तुला पाणी देणं यात काही खूप करते असं समजू नकोस.
दिवसभराच्या कष्टानंतर घरी जाऊन पुन्हा चुलीसमोर बसणे हे काम असतंच.
परवाच शेजारच्या वहिनी कुळिथ पाखडताना म्हणाल्या काही नाही तर पिठी आणि भात आहेच करायला..तेच होतय पोटभर!
या माझ्या थेट मैत्रिणी नाहीत. पण तरीही मला जवळच्या आहेत.यांच्यामुळे मला नवीन गोष्टी कळतात, गावातलं त्याचं आयुष्य कळतं आणि माझ्या कक्षा अधिक रूंदावत जातात.
मी जेव्हा दुपारच्या जेवणानंतर पुस्तक वाचत लोळत असते पंख्याखाली तेव्हा ती फाटी बांधत असते. मी पावसाचा गंध अनुभवून कविता लिहायला घेते निवांत पडवीत बसून तेव्हा वाळत घातलेल्या गोवर्या गोळा कहताना तिची तारांबळ उडत असते.पण तरीही तिचं आणि माझं "अंतरंग" एक आहे. फरक आहे तो बहिरंगात...

No comments:
Post a Comment