अचानक वाटेवर पडलेलं दिसलं लाल चाफ्याचं फूल!
भर उन्हातही त्याच्या लाल गुलाबी अन् गंधाळलेल्या कांतीने पाडत होतं भूल!!
महिला दिन आला आहे नं असं म्हणालं मला!
आश्चर्यच वाटलं मला त्याच्या या प्रश्नाचं?
का गं? पेचात पडलीस? म्हणालं मला!!
मी पहा,झाडापासून गळून पडलो ,लांब येऊन पडलो कुठेतरी
पण माझा रंग गंध पोत आजही टिकून आहे!
निसर्ग त्याची किमया दाखवेलच आता माझ्यावर त्यामुळे माझं कोमेजणं अपरिहार्यच गं!
पण तरीही झाडाला बिलगलेलं असतानाचं माझं अस्तित्व आजही तसच आहे माझ्या हृदयात!
त्यामुळे निसर्गाचे आघात,रस्त्यावरची वाहनं,गर्दी,मला तुडवून जाणारी माणसं या सगळ्यातही मी सांभाळलं आहे माझं "मी"पण!!!
केवळ एक दिवसच स्वतःचं आत्मभान जगण्यापेक्षा मी रोजच जगेन माझं मीपण! माझ्याच आनंदात आणि असच मिसळून जाईन मातीत अलगद! पण तेव्हाही त्या मातीला देईन माझा मऊ कोमलसा आणि गंधाळलेला नाजूक गुलाबी रंग!!! जो राहिल कायम धरित्रीच्या कुशीत! तिचीही कूस गंधाळून टाकत!! आर्या.
भर उन्हातही त्याच्या लाल गुलाबी अन् गंधाळलेल्या कांतीने पाडत होतं भूल!!
महिला दिन आला आहे नं असं म्हणालं मला!
आश्चर्यच वाटलं मला त्याच्या या प्रश्नाचं?
का गं? पेचात पडलीस? म्हणालं मला!!
मी पहा,झाडापासून गळून पडलो ,लांब येऊन पडलो कुठेतरी
पण माझा रंग गंध पोत आजही टिकून आहे!
निसर्ग त्याची किमया दाखवेलच आता माझ्यावर त्यामुळे माझं कोमेजणं अपरिहार्यच गं!
पण तरीही झाडाला बिलगलेलं असतानाचं माझं अस्तित्व आजही तसच आहे माझ्या हृदयात!
केवळ एक दिवसच स्वतःचं आत्मभान जगण्यापेक्षा मी रोजच जगेन माझं मीपण! माझ्याच आनंदात आणि असच मिसळून जाईन मातीत अलगद! पण तेव्हाही त्या मातीला देईन माझा मऊ कोमलसा आणि गंधाळलेला नाजूक गुलाबी रंग!!! जो राहिल कायम धरित्रीच्या कुशीत! तिचीही कूस गंधाळून टाकत!! आर्या.
No comments:
Post a Comment