काय शोधते आहे,कुठे आणि का शोधते आहे कळत नाही आहे मला!
हिरवाईच्या पात्यात सापडलास असं वाटलं पण जवळ गेले तर तो होता पावसाचा टपोरा थेंब!
विसावला माझ्या बोटाच्या पेरावर अलगद आणि क्षणात गुडूपही झाला तिथेच.
काळ्या ढगांच्या सोनेरी किनारीत सापडशील असं वाटलं!
पण तिथे पाहत राहिले तर.... पावसाच्या मोत्यांच्या लडीच सोनेरी झाल्या अणि तुझं असणं त्यातच विरघळलं!!
शोधलं मी तुला माझ्या मनाच्या खोल खोल आत!
निर्मळ गाभार्यात.. जिथे फक्त तूच आहेस असं वाटलं...
पण नाही... तिथेही तू नव्हतास....
आहेस तरी कुठे???
का शोधते आहे मी तुला???
माझं असणं हेच जणू तुझं असणं आहे हे उमगलच नव्हतं मला!!
मग कळलं की मीही होते पात्यावरच्या थेंबात... ढगांच्या सोनेरी किनारीत....
आर्या

No comments:
Post a Comment