लंगर # एक भक्तिपूर्ण आठवण
आज फेसबुकवरच लंगरविषयी माहिती वाचनात आली आणि मी भूतकाळात गेले. व्हॅली आॅफ फ्लाॅवर्सच्या आमच्या ट्रेकची आठवण झाली. एक सामाईक रस्ता फाटा फुटून पुष्पदरीच्या स्वर्गीय प्रांतात नेतो तर तीच वाट सरळ पुढे हेमकुंडसाहिब लोकपाल सरोवराला जाते.
आदल्या दिवशी पुष्पदरीच्या रमणीय परिसरात मी छान रमले होते आणि आशुतोष फुलांच्या प्रजाती शोधत होता. हा मला घेऊन इतक्या रमणीय ठिकाणी येऊन वनस्पतीशास्रात का शिरला आहे हे माझ्या गावीही येईना. त्यामुळे अरसिकेषुकवित्वनिवेदनम् अशी माझी गत झाली होती. सारांश काय तर दुसर्या दिवशी हेमकुंडला गेल्यावर हा मनुष्य आत दर्शनाला येणार की नुसताच गिरीशिखरं पाहत बसणार हे मला समजत नव्हतं. असो.....
आमच्या छोटोखानी हाॅटेलच्या समोरच छोटा गुरुद्वारा होता. संपूर्ण रस्त्यातच असे ठिकठिकाणी लंगर आपली सेवा करतात. ती दिखाऊ नसते. त्यात सच्चेपणा असतो.
एकूणातच शारिरीकदृष्ट्या थकवणारा हेमकुंडचा चढ आणि विरळ प्राणवायू ओलांडून आम्ही सात वाजता पोचलो होतो गुरुद्वारात. पहाटे साडेतीनला काळोखातच चालायला सुरुवात केली होती. त्यावेळीही आमच्यासोबत शीख यात्रेकरुंचे लोंढेच्या लोंढे निघालेले होते. बोचरी थंडी जाणवत होती. हातपाय गारठले होते. आव्हान देणारी गिरीशिखरं नजरेत सामावत नव्हती. लोकपाल सरोवरापाशी तर थंडीचा उच्चांक. पायातले बूट काढवेनात. तोवर एका मध्यमवयीन शीख काकांनी मला मदत केली. गरम गरम पाणी आणून दिलं हात तोंड धुवायला. इतक्या थंडीत ढणाणत्या चुलाण्यावर मोठ्या पातेल्यात पाणी तापत होतं. नंतर दोन जणांनी दोन जाड ब्लॅंकेटस् आमच्यावर पांघरली. कडकडीत चहा दिला प्यायला. हुशारी आली अणि मग हेमकुंडसाहिबजी समोर नतमस्तक झालो.आशुतोष त्या वातावरणात स्वतःला विसरलाच होता! गुरुग्रंथसाहिबचे मंद पठण, इतक्या दुर्गम ठिकाणीही फुलांची मोहक सजावट आणि स्वच्छता!!!
बाहेर आल्यावर प्रसादाची ऊन ऊन खाचडी आणि साजुक तुपातला मुगाचा शिरा! त्या प्रसादाची चव आजही जिभेवर रेंगाळते आहे.
आपल्या झुली उतरवून आलेल्या प्रत्येकाला विनासंकोच तत्पर सेवा भक्तिभावाने पुरवणारे ते सर्व शीख बंधु भगिनी कायम मनात अढळ स्थानी आहेत माझ्या!!

No comments:
Post a Comment