असं एक यंत्र हवं...
जे सहज घेऊन जाईल दूर दूर नव्या प्रदेशात...
असा प्रदेश हवा परीकथेसारखा..
जिथे असतील वात्सल्याच्या नद्या, आनंदाची झाडं, प्रेमाची बेटं, गोड पाण्याचा समुद्र, सुवासाचे रान,लखलखती वाळू, मायेचे उंच पर्वत, आणि परस्परांसाठी आसुसलेले जीव, प्राणिमात्र...

असं असावं एक यंत्र जे परत नेईल पाठी भूतकाळात...
मनात पक्की रुतलेली स्मरणचित्र दाखवत जाईल ते हळूहळू काळाच्या पडद्यावर..

असं असावं एक यंत्र....
जे सगळ्यांनाच बांधेल एका नाजूक धाग्यात आत्मीयतेच्या....
असंअसावं एक यंत्र जे आठवण करुन देईल हळव्या क्षणांची, लटक्या भांडणांची आणि पुन्हा जुळवलेल्या भावबंधाची....
असं असावं एक यंत्र जे सफर करुन आणेल विश्वाची, लुकलुकणार्या तार्यांची,गूढडोह आकाशगंगांची...
असं असावं एक यंत्र जे पोचवेल आपल्याला हवं तेव्हा हवं तिथे हवं त्या माणसांच्यात....
असं असावं एक यंत्र जे वाचेल दुसर्याचं मन अणि ऐकवेल आपल्याला त्याचं गुज...
असं असावं एक यंत्र जे नेईल काळाच्या आड केव्हा ना केव्हा.... पण तिथे असू आपण सगळेच पुन्हा एकत्र, अकृत्रिम स्नेहाने बांधलेले, वात्सल्याच्या नदीत डुंबणारे, आनंदाच्या झाडावर चढणारे,सुवासिक रानात उनाडणारे, गोड्या समुद्रात डुंबणारे, लखलखत्या वाळूचे किल्ले बांधणारे आणि मायेची पर्वतशिखरं ओलांडून पुन्हा नव्या परिकथेच्या प्रदेशात जाणारे... घट्ट बांधलेल्या हातांनी....
आर्या

No comments:
Post a Comment