मैत्री!
आत्म्याचा आनंद! सुखाचा भावबंध!!
समाधानाची साथ! आधाराचा हात!!
दुःखाची वाटेकरी! निराशेची भागीदारी!
निरुत्साहाचे उत्तर! सहवासाचे मंद अत्तर!
जादूची कुपी! विश्वासाचा फाया!
आत्मीयतेने गंधित वात्सल्य आणि माया!!
कौतुकाची थाप! टीकेचा अधिकार!
रुजलेल्या प्रेमबीजात होई मैत्रीचा वृक्ष डेरेदार!!
सख्याची उर्मी मृत्यूनंतरही चिरंतन!
मैत्रीच्या नात्याला ना स्थळ काळाचे बंधन!!
आर्या
आत्म्याचा आनंद! सुखाचा भावबंध!!
समाधानाची साथ! आधाराचा हात!!
दुःखाची वाटेकरी! निराशेची भागीदारी!
निरुत्साहाचे उत्तर! सहवासाचे मंद अत्तर!
जादूची कुपी! विश्वासाचा फाया!
आत्मीयतेने गंधित वात्सल्य आणि माया!!
कौतुकाची थाप! टीकेचा अधिकार!
रुजलेल्या प्रेमबीजात होई मैत्रीचा वृक्ष डेरेदार!!
सख्याची उर्मी मृत्यूनंतरही चिरंतन!
मैत्रीच्या नात्याला ना स्थळ काळाचे बंधन!!
आर्या
No comments:
Post a Comment