Tuesday, 7 August 2018

आभाळ तळ्यात पाहताना


निळं आभाळ झालं आहे खुळं!
त्याच्या खाली आहे शुभ्र नितळ तळं!!
वाकून डोकावून पाहत राहतं तळ्यात!
कुणाचीतरी वाट पाहण्याची हौस त्याच्या मनात!!
नकळत सर्वांच्या शोधतं ते काही!
ढग बसतात कुजबुजत पण पत्ता लागत नाही!!
काय शोधत असेल बरं अंदाज येत नाही
आभाळही शहाणं गुपीत उलगडत नाही!!
अचानक येते लहर ध्यानीमनी नसताना!
माखून येते रानफुलांचा घमघमीत नजराणा!!
आभाळ जातं सुखावून लहरीच्या अस्तित्वाने!
त्याच्या घनगर्द पोकळीत विसावते ती ही सुखाने!!
ढग लागतात पुन्हा कुजबुजू उलगडलेल्या गुपिताने!
काय पाहत होतं हे सारखं खाली झुकून?
स्वतःच्या जागेपासून थोडं खाली उतरुन??
लहरी "लहर" फारच शहाणी,  नकळत येते आणि विसावते!
अथांग आभाळाला मात्र तिची उगीचच वाट पहायला लावते!
र्या

No comments:

Post a Comment

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...