नदीच्या प्रवाहात, झाडाच्या सावलीत
पक्ष्याच्या घरट्यात, भेटला मज गुरु!
ग्रंथाच्या पानात, आईच्या वात्सल्यात,
वारकर्याच्या नामात, भेटला मज गुरु!!
जनात मनात ,गर्दीत एकांतात
ठायी ठायी मज, भेटला माझा गुरु!!
आकाशीच्या मेघात, मेघाच्या पावसात,
पावसाच्या थेंबात, भेटला माझा गुरु!!
लेखणीत,कागदात,संगीताच्या सुरात
फुलपाखराच्या पंखी,भेटला मज गुरु!!
जेथे जेथे जाई, गुरु सर्वांठायी
सचेतन अचेतनातही भेटला माझा गुरु!
चंद्र आणि सूर्य, तारे तारकात,
आकाशगंगेच्या काठी, भेटला मज गुरु!!
सारे व्यापुनी राहिला, तरी उरुनी राहिला!
माझिया अंतर्यामी भेटला मज गुरु!!
आर्या.
पक्ष्याच्या घरट्यात, भेटला मज गुरु!
ग्रंथाच्या पानात, आईच्या वात्सल्यात,
वारकर्याच्या नामात, भेटला मज गुरु!!
जनात मनात ,गर्दीत एकांतात
ठायी ठायी मज, भेटला माझा गुरु!!
आकाशीच्या मेघात, मेघाच्या पावसात,
पावसाच्या थेंबात, भेटला माझा गुरु!!
लेखणीत,कागदात,संगीताच्या सुरात
फुलपाखराच्या पंखी,भेटला मज गुरु!!
जेथे जेथे जाई, गुरु सर्वांठायी
सचेतन अचेतनातही भेटला माझा गुरु!
चंद्र आणि सूर्य, तारे तारकात,
आकाशगंगेच्या काठी, भेटला मज गुरु!!
सारे व्यापुनी राहिला, तरी उरुनी राहिला!
माझिया अंतर्यामी भेटला मज गुरु!!
आर्या.
No comments:
Post a Comment