काल मला भेटला इतिहास
आपल्या देशाचा...
तो म्हणाला आता सध्या सगळेच वाचतील मला समरसून...
स्वातंत्र्यदिन आला नं जवळ "आपला!"
पण वाचून उपयोग काय तुला??
मी विचारलं त्याला!
तुझी सोनेरी पानं ज्यांनी लिहीली ते कोण होते??आठवतं का रे तुला??
फार छान प्रश्न...
ते होते भारतीय..... फक्त आणि फक्त भारतीय....
संस्कृतीच्या आणि संपन्नतेच्या अग्नीच्या धुराचे वारस
धर्माच्या निर्बंधतेचे पालक...
परस्परांच्या खांद्याला खांदा लावून देशासाठी लढणारे फक्त भारतीय नागरिक...
कोणत्या कुटुंबात जन्मलो याचाही विसर पडला होता त्यांना..
एकच गोत्र होतं त्यांचं.... देशाचं स्वातंत्र्य!!!
पण आता काय झालं नं..
इतिहास म्हणाला... तुम्ही आता फक्त जन्माचं स्वातंत्र्य जगू लागलात आणि देशाचं विस्मरणच झालं आहे तुम्हाला...
मीच अश्रू गाळतो आहे ... काय करु?
माझा वंशज होऊ घातलेला नवा इतिहास त्याच्या पानांवर, खांद्यावर नक्की काय घेऊन जगणार याचीच चिंता लागली आहे मला...
आर्या

No comments:
Post a Comment