Monday, 14 January 2019

नमो विवेकानंदाय

सुमंगला सुदर्शना लावण्यखणी
वाहते पुष्पांजली तुझिया चरणी
तव कृपेचा आशीर्वच मिळावा
रामकृष्ण नरेंद्र सारदेप्रती
लोभ माझा जडावा!!
रंगावली ही सुंदर सजली
स्वामींच्या जीवनपटी खुलली
अशा साजिर्‍या कले"कलेने"
जीवनचंद्र उजळावा
रामकृष्ण नरेंद्र सारदेप्रती लोभ माझा जडावा!!
कलाकार हे असे मनस्वी
रंगूनिया झाले तेजस्वी
कार्य अतुल हे त्यांचे पाहून
मनी कौतुकोद्गार स्फुरावा
रामकृष्ण नरेंद्र सारदेप्रती लोभ माझा जडावा!!
आर्या


No comments:

Post a Comment

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...