Wednesday, 2 January 2019

मोबाईल...

मृदूलला कायमचीच घाई. सकाळी उशिरा उठायचं.दादाशी भांडून स्वतः मधे घुसून आवरायचं आणि आईने दिलेला डबा बॅगेत टाकत लोकल पकडायची सव्वासातची छत्रपती शिवाजी टर्मिनसची.
कधी मयंक बाईकवर जाणार असेल तर दादरपर्यंत भाऊराया सोडायचा. अन्यथा धावपळ रोजचीच.
एका इंग्रजी दूरचित्रवाहिनीवर वार्तांकन करण्याच्या कामी नुकतीच नोकरीला लागलेली मृदूल.
मास कम्युनिकेशन केलं आणि चटपटीत मृदूल लगेच नोकरीवर रुजूही झाली.
मित्रपरिवारात रमणारी,भावुक पण गंभीर प्रसंगात तितकीच ठाम उभी राहणारी मृदूल...
पण मृदूलला अस्वस्थ करणारी घटना काहीशी गंमतीदार अशी घडली....
अशीच एक दिवस गडबडीनेच रोजच्यासारखी मृदूल धावतपाळत निघाली.
पर्समधे सगळं सामान कोबलेलं.. कंगवा रूमाल मेकअपचं सामान,पेन,पर्स,रूमाल,डबा,एक टाॅप, नोटपॅड,हँड्सफ्री, आणि मोबाईल...
गडबडीने चढली आणि सुदैवाने जागातरी मिळाली चौथ्या सीटवरची.
जरा डूलकी काढूया असा विचार आला मनात पण अचानक आठवलं आज एकेठिकाणी मुलाखत घ्यायला जायचय. पियुशला जागवायला हवं नाहीतर गधडा राहील झोपून राहील घरी....
पर्समधल्या असंख्य वस्तूंमधून मोबाईल शोधण्याची कसरत रोजचीच.... पण आज काही केल्या ते यंत्र सापडेना.....
घरी राहिला,पडला, गर्दीत कुणी काढला????
माटुंगा आल्यावर तिला वैतागून उठावंचं लागलं. दादरला मॅडम उतरल्या वैतागूनच.....
दादरटीटीला स्वारी चरफडतच पोहोचली. आॅफिसमधून स्वतःचाच नंबर लावला तिने. फोन बंद.....
हे होतय तोवर मिनूच्या फोनवर आईचा फोन.अग मृदूल कुठे आहे??
वेट आँटी.आली आहे ती आॅफिसला...
अग फोन कुठे आहे????
आई अग मोबाईल हरवलाय बहुतेक...
बहुतेक??????
दोन मिनीटे शांतता...
अग तूझ्या फोनवरून मला फोन आला होता... तू कीपॅड लाॅक नाही का केलेलस???
अग होनं सेटींग बदलून देईल जयेशला कामासाठी ठरवल पण काय झालं... बहुतेक लाॅक नव्हता तो....
अग समोरून कुणीतरी बोलत होतं...
तू त्याच्या ताब्यात आहेस म्हणत होत....
काय आई???
अग खरंच. म्हणून घाबरून मी मिनूला फोन केला तू पोचलीस की नाही ते विचारायला.
लहान आहेस का आता तोडचं पाणी पळवलंसं.
एकतर हल्ली कुठेकुठे जाऊन बातम्या गोळा करत फिरतेस.तू समोर दिसेपर्यंत घरात चैन पडत नाही मला"
आई प्लीज.फील्मी डायलाॅग प्लीज थांबव. मला शोधूदे आधी जरा फोन.
तिने फोन कट केला.
एव्हाना जगभरातल्या बातम्या गोळा करणार्‍या आॅफिसला ही बातमी कळलीच की मृदूलचा सेलफोन हरवलाय.
त्या दिवसभरात मृदूलच्या फोनवरून सेव्ह असलेल्या सर्व नंबरवर फोन गेले आणि मृदूलला कीडनॅप केल्याची बातमी पसरली वार्‍यासारखी....
घरातले सर्व फोन... आई बाबा दादा... काका.... लँडलाईन... आॅफिस.....
दिवस संपेपर्यंत गोंधळ चालूच. मृदूलने हटवादीपणाकरून बाबांना पोलिसात कळवेही दिलं नाही....
जगाच्या बित्तंबातम्या शोधणारी ही मुलगी स्वतःच्या फोनबाबत इतकी बधीर कशी काय???
करेल काय??? सहा महिन्यातला तिसरा सेलफोन हरवला होता तिचा... काय करणार ती तरी.....
शेवटी संध्याकाळी दादा आॅफिसमधे आला तिला घ्यायला....
घरी पोचून जेवायचीही इच्छा उरली नव्हती तिला...
बडबड तर सर्वांचीच सूरु अखंड... काळजी,ताण याचं रूपांतर विनोदातही झालं...
उद्या उठून मी तक्रार नोंदवणार आहेच मृदूल. कुणीतरी गैरवापर करतं आहे तूझ्या फोनचा....
त्यातून तुझं क्षेत्र असं... काही झालं तर.....
त्याने शेवटी फोन लावला आपल्या फोनवरून तर तो बंद होता...
झोपण्याच्या विचारात असतानाच बेल वाजली... सागर दारात उभा...
सागर आत्ता....
अरे कुठे होतास तू?
आॅफिसमधून फोन केला तोही घेतला नाहीस... घरी फोन केला तर काकू म्हणाल्या निघाला आहेस म्हणून बँकेत जायला....
हो हो हो.... हे घ्या... सांभाळा......
सागरच्या हातात तिचा हँडसेट होता.... सगळा बॅलन्स मी संपवलाय तुझा आणि मग बंद करून ठेवलाय...
सकाळी स्लो ट्रेनला चढलीस नं??? मी मागच्याच डब्यात होतो. चढताना फोन पडला तुझा. पर्सचा वरचा कप्पा उघडाच... त्यातून पडले हे महाशय......
मी त्यापायी गाडी सोडली... पण करणं भागच होत..
दोन वर्षांनी लग्न झालं आपलं की दर दोन महिन्याला हँडसेट घेऊन देणं मला नाही हं परवडणार मृदूल ....
सागरच्या या वाक्यावर सगळेच हसले आणि दादाने आणलेल्या आईक्रीमच्या गारव्यात तो दिवस संपला...


No comments:

Post a Comment

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...