Wednesday, 30 January 2019

रायपाटण बागवाडी

बागवाडी.रायपाटण. पावसाळ्यात दुथडी भरुन वाहणार्‍या साकवावरून पुढे गेलं की चिर्‍याच्या पायर्‍या आपल्याला खड्या चढणीने एका चार वाड्यांच्या टुमदार परिसरात नेतात.
आज राष्ट सेविका समितीच्या अनुभवी आणि ज्येष्ठ कार्यकर्त्या संजनाताई मराठे आणि श्रुतीताई ताम्हनकर यांच्यामुळे मला या गावात जायला मिळालं.
अगदी अक्षरशः परवाच संजनाताई ताम्हाण्यात येऊन गेल्या घरी आणि मैत्रीच झाली.
रायपाटणात हळदीकूंकू आणि मातृशक्ती व राष्टघडण विषयावर  त्यांचे मार्गदर्शन,महिलांचे खेळ असा कार्यक्रम होता. त्यांनी मला आमंत्रण दिलं आणि एक छान अनुभव मला मिळाला.
ताम्हाण्यातून कुठल्यातरी आतल्या गावात वाहने बदलत एकटीने जाण्याची मज्जा मी घेतली. आडवाटेच्या गावात शाळा, तिथले शिक्षकगण, पहिली ते सातवीचे तेहतीस विद्यार्थी, कार्यक्षम आणि उत्साही ग्रामीण महिला आणि वाड्यावाड्यातून आलेल्या महिलांचे हसू आणि आनंद असा मस्त अनुभव मिळाला.
शेवटी काय तर संघ,केंद्र,प्रबोधिनी, समिती हे सर्व वर्तुळ कुठेतरी पूर्ण होतं.. ओळखी निघतात... रत्नागिरीतल्या छोट्या गावापासून अरूणाचल आसामपर्यंत गप्पा होतात आणि शेवटी आपण सर्वजण राष्टघडणीच्या वारीचे वारकरी ही खूणगाठ मनाची घट्ट बसते... पुन्हा एकदा.


No comments:

Post a Comment

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...