Wednesday, 30 January 2019

सुतारपक्षी

अंगणात माझ्या वृक्ष डेरेदार
पक्षिगणांच्या अस्तित्वाचे राखणदार
एक सुतारपक्षी लाल तुर्‍याचा
त्याच्या मित्रांसमवेत अंगणात यायचा
आवाज त्यांचा खूप बडबडही फार
एकमेकांना गोष्टी सांगतात भारंभार
आज आली त्याला हौस नाच करण्याची
झाडाच्या बुंध्याला बिलगून गिरकी घेण्याची
त्याला नव्हते माहिती की मी उभी होते
त्याचे सगळे विभ्रम दुरुन पाहत होते
लाल तुरा उडवीत गोल फिरून दमला
माझ्या मनाला  कोवळा हळुवार आनंद देऊन गेला.


No comments:

Post a Comment

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...