शाळेचं स्नेहसंमेलन होतं.मधुराने नाचात भाग घेतला होता...
"बाबा तू येणार आहेस नं रे?"
हो पिलू प्रयत्न करेन. मला मिटींग आहे राजा...
ते काही नाही.... नेहमीचंच आहे बाबा तुझं....
नाही ग पिलू.. कामं असतात ग मला...
आईला पण असतात पण ती कशी येते आॅफिसमधून वेळ काढून...
पिलू अग तू लहान आहेस हे समजायला.आईचे व्याप आणि माझे व्याप वेगवेगळे आहेत. तू लहान आहेस म्हणून आई थोडा वेळच जाते गं आॅफिसला. पण मला तसं करून नाही चालणार नं"
का रे?
अग आपण छान छान गोष्टी घेतो,कपडे,खाऊ,खेळणी त्यासाठी पैसे लागतात नं.ते मिळवण्यासाठी मला जास्त काम करावं लागतं"
ते काही नाही.मला यातलं काहीही नकोय.फक्त तू ये नाच पहायला माझा.बास...
आईने बाबाला डोळ्यानेच खुणावलं आणि कारची किल्ली घेऊन बाबा निघाला. मधुराचा पाप घेऊन त्याने दार उघडलं आणि तो गेलाही...
मधुरा धूसफुसत बसली होती. आईही निघाली मावशी आणि आजीजवळ मधुराला ठेऊन.
मावशी म्हणजे वंदू मावशी.मधुरा बाळ असल्यापासून तिला सांभाळायला यायची... आणि आजी म्हणजे मधुराच्या बाबाची आई.
पिला मी लवकर येते आज.तू लवकर जेव आणि थोडी झोपही.म्हणजे मग आज नाचासाठी शाळेत जाईपर्यंत थोडी ताजीतवानी होशील....
आईही गेल्यावर मधुरा खट्टू झाली पण आज शाळेत जायचय,नाचायचय या कल्पनेने नंतर आनंदूनही गेली..
आज सगळं छान आवरून नवा फ्राॅक,हेअरबँड,मोजे असं सगळं मस्त मॅचिंग करून परीराणी निघाली आई आणि आजीबरोबर रीक्षाने...
आई बाबा येणार आहे नं???
मधुराचा नाच दुसराच होता.
तिला स्टेजवरून बाबा दिसला आणि तिने नाचता नाचताच बाबाला आनंदून हाक मारली!!!
नाचल्यावर खाली आल्यावर बाबाच तिला स्टेजजवळ आणायला गेला. बाबाच्या गळ्याला मिठी मारत आणि बाबाची पापी घेतच मधुरा हसली.
घरी येताना हाॅटेलात जेवून यायचा बेत बाबाने आईशी बोलून ठरवला होता. छोटुकली परीताई नाचतच मॅक डीच्या पायर्या चढली.
चढताना तिला एक छोटी काळीबेद्री मुलगी हातात ख्रिसमसच्या टोप्या विकताना दिसली. ती मधुराकडे आसुसून पाहतच राहिली...
फ्रेंच फ्राईज खातानाही काचेच्या पलीकडून मधुराला ती छोटी दिसतच राहिली.
बाबाला मधुराची अस्वस्थता दिसली...
जेवण संपवून सर्वजण बाहेर पडले.
मधूराला हसण्याचा आवाज ऐकू आला म्हणून तिने पाहिलं तर ती छोटी आपल्या बाबाबरोबर बसून जेवत होती.तिची आई असावी बहुधा जी रस्त्यावरच तीन दगड मांडून एका पांढर्या काळा पातेल्यात स्वयंपाक करून वाढत होती...
मधुराचं डोकं चालेना... ती पुन्हा पुन्हा टोपी विकणारी मुलगी हसताना आणि तिच्या बाबांकडे पाहत राहिली. ते तिला भरवत होते..
आता मधुरा अनिमिष डोळ्यांनी तिच्याकडे पाहत राहिली...
झोपताना बाबा मधुराला म्हणाला, काय आज एक बाळ खुश आहे नं????
हो ..... पण नाही पण.....
म्हणजे काय बाळा????
आलो नं तुझ्यासाठी पिला... मस्त जेवलो,आईस्कीम खाल्लं आणि छान नाचल्याबद्दल आजीने बक्षीसही घेऊन दिलं...
बरं मधुरा मी उद्या पहाटेच जाणार आहे पिलू आॅस्टेलियाला.मुंबईला जाणार आणि मग तिथून मस्फ वामानातून भूररररर... काय आणू पिलूसाठी????
बाबा कधी येशील परत???
मनू बाबा दोन महिन्यासाठी जातो आहे प्रोजेक्टचं काम आहे नं त्याचं" आई म्हणाली...
बाबा..... एकच आणशील???
आलास की रोज रात्री माझ्याबरोबर जेवायला येशील रात्री ? मी झोपल्यावर तू येतोस आणि सकाळी टेन मिनीटस्च भेटतोस मला ब्रेकफास्टला....
आपण त्या टोपी विकणार्या मुलीसारखं आणि तिच्या बाबासारखं हसत हसत जेवत जाऊया नं रे!!!"
सकाळी विमानतळावर निघलेल्या बाबाची अस्वस्थता आई आणि आजीला कळली होतीच पण टेडी कुशीत घेऊन बाबाच्या सोबत रात्री हसून जेवण्याचं स्वप्नं पाहणार्या मधुराला त्याची पुसटशी कल्पनाही नव्हती... ती आठवत होती त्या काळ्याकुट्ट पण हसर्या लेकीला...
Saturday, 5 January 2019
मधुराचं स्वप्न
Subscribe to:
Post Comments (Atom)
राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.
राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू. प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी छत्रपती शिवाजी महाराजांचे ...
-
राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू. प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी छत्रपती शिवाजी महाराजांचे ...
-
उदो बोला उदो ! डॉ. आर्या आशुतोष जोशी शरद ऋतूचा मन प्रफुल्लित करणारा अनुभव देत देत घटात विराजमान होते आदिमाया, जगज्जननी ! नऊ रा...
-
मनात विचारांचं काहुर पेटवत ती क्षितीजावर रेंगाळत राहिली.... तिची छाया परिसरात आणि मनातही पसरू लागली..... क्षितीजावर तिच्या गुलाबी झाकेचे वि...
No comments:
Post a Comment