Tuesday, 8 January 2019

ते दोघे

बसले आहेत दोघे एकमेकांसोबत
गंधाळलेल्या वार्‍यावरती  उतरत्या सांजछायेत
एक उडतो दूरदूर नेहमी एक असतो गावात
तरीही प्रेम रूंजी घालते परस्परांच्या स्नेहात
एक थोडा शहाणा एक थोडा वेडा
तरीही आपुलकीने त्यांचा आत्मीयतेचा ओढा
नीलनभाच्या छायेखाली मैत्री अशीच बहरू दे
पंखांवरच्या नक्षीने जीवन सारं रंगू दे..


No comments:

Post a Comment

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...