एस एन डी टी चा निसर्गरम्य परिसर. पाचवी ते दहावी या रस्त्याने फिरताना ताया दिसत. मजा करणार्या, कँटिनमधे खाऊ खाणार्या,लायब्ररीतून पुस्तकं नेत असलेल्या, बेकरी विभागात शिकत असलेल्या ताया हातात केकचे ट्रे घेउन फिरताना दिसत तेव्हा तोंडाला पाणीच सुटे. आपण शाळेत वेळापत्रकाप्रमाणे बसायचं आणि या ताया मस्त उनाडत असतात असंही मनात येऊन जाई.
या जगाची नवलाई वाटे. शाळेपासून विद्यापीठाच्या पुढच्या दारापर्यंत जाता येता ही मौज दिसे. बावीस वर्ष लोटली तरी इथलं मैदान,इथला सुंदर राखलेला निसर्ग आजही आठवतो.
मला गणित आणि शास्र येत नाही म्हणून बाबांना काळजी वाटे. अनेकदा इथून जाता येता मला त्यांची काळजी आठवत असे आणि मी अस्वस्थ होई. आई गेल्यानंतर तर बाबांना माझी अधिकच काळजी वाटे.
हुशार आहे पण हिचा कल निव्वळ पैसे मिळवणारा नाही. कसं होईल हीचं?
आज बाबा पाहत असतील निःशंक. आज मी इथे मराठी विकिपीडियाची कार्यशाळा घ्यायला आले आहे. जुने दिवस तरळून जात आहेत. पैसा, बुद्धीमत्तेचा विधायक कामात वापर, मानसन्मान आणि स्वतःबद्दलचा अभिमान असं सारं सॅकमधे घालून आज मी या परिसरात चक्क पायर्यांवर मस्त बसले आहे.
ज्ञात भूतकाळाच्या छायेत अभिमानास्पद वर्तमान कर्तृत्वाची शिखरं चढणार्या भविष्यकाळाची स्वप्नं पहात....
Saturday, 9 February 2019
मागे वळून पाहताना
Subscribe to:
Post Comments (Atom)
राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.
राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू. प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी छत्रपती शिवाजी महाराजांचे ...
-
राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू. प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी छत्रपती शिवाजी महाराजांचे ...
-
उदो बोला उदो ! डॉ. आर्या आशुतोष जोशी शरद ऋतूचा मन प्रफुल्लित करणारा अनुभव देत देत घटात विराजमान होते आदिमाया, जगज्जननी ! नऊ रा...
-
मनात विचारांचं काहुर पेटवत ती क्षितीजावर रेंगाळत राहिली.... तिची छाया परिसरात आणि मनातही पसरू लागली..... क्षितीजावर तिच्या गुलाबी झाकेचे वि...
No comments:
Post a Comment