Wednesday, 6 March 2019

संकासुर

तुझ्या माझ्या संचिताचा एक कोवळा धागा आहे
कुणा निमित्ताने मी तुझी लीला वर्णिली आहे!
शोध माझा संपला अन् सापडले मीच मला
असुराच्या प्रेमांकुरी ज्ञानोदय जाहला!
कथा तुझी नृत्य तुझे बांधले कोणी दिठी
त्यात मज गवसला जगनियंता जगजेठी!
राबणार्‍या बांधवांचा आनंद मी पाहिला
अनाहत नादातूनी नृत्यभार संभारिला!
तुझा आणि  माझा असा कोवळा अनुबंध आहे
पामर लेखणीतूनी माझ्या  मी तुला आदरले आहे!!
आर्या


No comments:

Post a Comment

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...