Saturday, 9 March 2019

छोटंस गुपित

छोटासा आनंद छोटीशी इच्छा
छोट्या स्वप्नांची छोटीशी मज्जा
छोटंसं स्वप्नं छोटीशी दाद
लेऊन येते मखमली साद
छोटंसं मन छोटंसं आकाश
छोट्याशा आकाशाला अत्तराचा वास
छोट्याशा कुपीत इवलासा मोती
मोतिया रंगात विरघळती नाती
छोटेसे हात छोटे छोटे प्राण
छोट्याशा प्राणांचे हरपले भान
हे सारे आहे माझे, मीच आहे छोटी
माझ्या छोट्या मनात मात्र, मोठ्या मोठ्या गोष्टी


No comments:

Post a Comment

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...