Sunday, 19 May 2019

ओठांवरचे हास्य

#ओठांवरचे हास्य

ओठांवरच्या हास्यात लपतात भावनांच्या छटा
त्यातूनच फुटतात आनंदसागराला लाटा!
कधी ते हास्य गोजिरवाण्या बाळाचं
दुधाच्या उबदार थेंबांतून झिरपणार्‍या वात्सल्याचं!
कधी ओठांवरचं हास्य सौंदर्य उधळीत येतं
मनातलं गुज डोळ्यांवाटे ओठांपर्यंत येतं!
कधी ते हास्य स्वतःच खूप बोलतं
पाहणार्‍याला अलगद वेड लावून जातं!
ओठांवरचं हास्य कधी गुलाबपाण्याने भिजतं
दोन डोळ्यांच्या पाकळ्यांमधून थेंबाथेंबातून पाझरतं!
हे हास्य कधीतरी स्वेदगंगा होतं
राबणार्‍या श्रमिकाला समाधानाची झालर देतं!


No comments:

Post a Comment

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...