Thursday, 26 September 2019

बाबा 75

नवमीचा काला
आनंद भरीला
जन्मला गोविंद
गोकुळात!
आईची माया
वात्सल्याची छाया
बांधवांचे बंध
बांधुनिया!
लौकिक आयुष्य
झाले इंद्रधनुष्य
हात "उत्तम भाग्याचा"
आला हाती!
संसार क्षितिजावरी
"प्राची"ची खुमारी
प्रभा पसरली
जीवनात!
शंकर "तोष"ला
हर्ष मनी झाला
पुण्यवंत गेला
आ"नंदु"नि!
जाहला संसार
सुफळ संपूर्ण
पृथ्वीदान केले
"अभया"ला!
आईची गाथा
पुन्हा आठविता
तिसरी पिढी जोजविता
आपुल्या कुशी!
"अनाहत"नाद
जीवन संगीत
उजळली वाट
"दिपानविता"
स्नेह्यांचा मेळा
आप्तांचा गोतावळा
सुरेख सोहळा
जीवनचा!
मंगल क्षणाला
मंगल शुभेच्छा
वंदन करिता
"आर्या"देई!

No comments:

Post a Comment

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...