Thursday, 26 September 2019

अनामिक हुरहूर

#अनामिक हुरहूर
कधी तरी तीन सांज
टेकते कुणा बुरुजावर
मनात दाटून येते तेंव्हा
एक अनामिक हुरहूर!
कुण्या गावचा पक्षी
चुकार उडतची येतो
काळ्या कभिन्न डोंगरवाटा
उदास करुनी जातो
कुठूनतरी येतो कानी
घंटेचा नाद मंजुळ
पायथ्याच्या गावात
दिवे लागणीची होते वेळ
अनामिक हुरहूर मनी दाटते
निःशब्द होते रान
कुणी विरहिणी गात राहते
हरपून आपुले भान!

No comments:

Post a Comment

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...