Thursday, 26 September 2019

सूर प्रेमाचे

#सूर प्रेमाचे
भावनांच्या मैफलीत सूर प्रेमाचे उमटले
दोन नयनांचे सुरेल तानपुरे जुळले!
संभाषणात मनांच्या संवादिनी बोलू लागली
अधून मधून तिला तार सप्तकाची जोड मिळाली!
कधीतरी जोराने थाप पडली तबल्यावर
पखवाजही घुमू लागता आलो आपण भानावर!
साथीच्या मैफलीत असे होते अधून मधून
त्याचवेळी मंजुळ वेणू फुंकते काळजावरी धून!
मग होते शांत काहिली जीवाची
तब्येतीत रंगते मग पुन्हा मैफल दोन जीवांची!😊
सूर प्रेमाचे उमटतात ह्रदयावर
मैफल सुरूच राहते भैरवीच्या उंबरठ्यावर!☺️

No comments:

Post a Comment

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...