येई पालखी दारात
गणगोत जमती
नक्षीची पावले
अंगणात रेखिताती!
सजली घरेदारे
चढली तोरणे
रांगोळीच्या तालावरी
रंगा येई गाणे!
लेकीबाळी सजती
नथ शोभे नाकात
कंकण सजते हाती
बाजूबंद दंडात!
ओटी भरायला
सज्ज झाल्या सुवासिनी
देवी सजून बैसली
पालखीच्या सिंहासनी!
डुलत नाचत
येई दारात अंबिका
तिच्या स्वागताला
उमलती कलिका!
फुलांची पखरण
दारी वाजतो ढोलक
गावकराच्या कानात
डुलतो लोलक!
आई येई घरा
भेटण्या लेकरास
डोळा दाटतसे पाणी
पालखी येतसे खांद्यास!
घरधनी पूजा करी
धनीण भरी ओटी
सौख्य समाधान मागे
लेकरांच्यासाठी!
खेळे येती की पाठून
गोमू नाचते सजून
शिमग्याच्या उत्सवाला
मिळे आनंदाची धून!
गणगोत जमती
नक्षीची पावले
अंगणात रेखिताती!
सजली घरेदारे
चढली तोरणे
रांगोळीच्या तालावरी
रंगा येई गाणे!
लेकीबाळी सजती
नथ शोभे नाकात
कंकण सजते हाती
बाजूबंद दंडात!
ओटी भरायला
सज्ज झाल्या सुवासिनी
देवी सजून बैसली
पालखीच्या सिंहासनी!
डुलत नाचत
येई दारात अंबिका
तिच्या स्वागताला
उमलती कलिका!
फुलांची पखरण
दारी वाजतो ढोलक
गावकराच्या कानात
डुलतो लोलक!
आई येई घरा
भेटण्या लेकरास
डोळा दाटतसे पाणी
पालखी येतसे खांद्यास!
घरधनी पूजा करी
धनीण भरी ओटी
सौख्य समाधान मागे
लेकरांच्यासाठी!
खेळे येती की पाठून
गोमू नाचते सजून
शिमग्याच्या उत्सवाला
मिळे आनंदाची धून!
No comments:
Post a Comment