Friday, 6 March 2020

प्रकाशाचे गाणे (पुस्तक)

अरुणाताई विशेष आवडत्या लेखिका आणि त्यांचं स्रीविषयक लेखन मला फार जवळचं वाटतं.त्यामुळे हे पुस्तक हातात घेतलं आणि वेळात वेळ काढून संपवलं वाचून!
स्वातंत्र्यपूर्व काळातल्या स्रिया आणि त्यानी लिहीलेल्या त्यांच्या पुस्तकातल्या आठवणी! अरुणाताईंनी त्याचा थोडक्यात मागोवा घेतला आहे!त्या  महिलेच्या प्रवासाविषयी त्यांना काय वाटतं ते ही आवर्जून नोंदवलं आहे!
मलाही या महिलांबद्दल नव्याने कळलं!
कुणी महर्षी कर्व्यांच्या नात्यातल्या,तर कुणी स्वातंत्र्यवीरांची धाकटी वहिनी,कुणी एक शिक्षिका तर कुणी सर्वसामान्य गृहिणी,कुणी संघर्ष करीत राजकारणातही सहभाग घेतला तर कुणी एखाद्या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य केलं!
पण आज माझ्या हातात आहेत तशा कुठल्याही सुविधा या महिलांकडे नव्हत्या! कंटाळा आला स्वयंपाकाचा तर बाहेरून मागव, नवर्‍याची हक्काने मदत घे, एखाद्या कार्यक्रमात भाग घे, मी आर्थिक दृष्याही स्वयंपूर्ण माझ्या परीने! तरीही मला अनेकदा माझं दैनंदिन आयुष्य खूप त्रासदायक वाटतं!पण सुमारे 1907 ते 1970 पर्यंतच्या काळातल्या या महिलांना असं काही उपलब्ध नव्हतं.सर्वांना उत्तम शिक्षण मिळालं असंही नाहीच! पण तरी या महिलांनी आपलं स्वतःचं कुटुंब उत्तमरीत्या आहे त्या परिस्थितीला तोंड देत सावरलं,मुलांना घडवलं आणि समाजातील दीन दुबळ्यांनाही हात दिला,त्यातून नकळत त्या स्वतःही घडत गेल्या,वाढत गेल्या,फुलत गेल्या!
महिला दिनाच्या थोडं आधीच या अशा महिलांना माझं वंदन! असं थोडंतरी जगता आलं तरी छान असं मला वाटलं म्हणून पोचवलं!

No comments:

Post a Comment

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...