Tuesday, 15 September 2020

पाऊस कविता

 



ओलं मन ओले भान

ओलं झालं पावसाच्या
पहिल्या पुस्तकाचं पान!
हिरवी अक्षरे, थेंबांचे शब्द
पुस्तक वाचताना, तन मन धुंद
पक्ष्यांची लकेर, मातीचं हसणं
या विरामचिह्नांनी, मजकुराचं सजणं
आकाशाचे मुखपष्ठ,
वार्‍याची खूणगाठ
प्रत्येक पान उलगडताना
घनघोर बरसात
मिटलं पुस्तक
मनही मिटलं
ओल्याचिंब रानाचं
पारणं फिटलं




No comments:

Post a Comment

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...