Tuesday, 15 September 2020

नभ झाकोळ झाकोळ

 नभ झाकोळ झाकोळ

मनी कल्लोळ कल्लोळ
रानपक्ष्यांचे कूजन
त्याने नादले अंगण!
नभ भरून सावळे
उतरले दिठीपाशी
देहभान हरपले
चरणांच्या मिठीपाशी!
असा सोहळा चालला
माझे हृदय भरले
सावळ्याच्या आठवाला
श्यामघनही झरले!

आर्या.

No comments:

Post a Comment

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...