Friday, 12 May 2017

भटकंती सह्याद्रीतली

अमृतेश्वराच्या मंदिराचं गाजर दाखवून आशुतोषने मला रतनगडला जायला अखेर पटवलचं. एका चांदण्या रात्री आम्ही प्रवास करत भंडारदर्‍याला पोहोचलो.वाटेत गाडी नादुरुस्त झाल्यावर तिचं बाळंतपण होईपर्यंत आम्ही मारलेल्या गप्पा हा मजेशीर आठवणींचा खजिनाच आहे. दुसर्‍या दिवशीचा रतनगडाचा ट्रेक निवांतपणे अनुभवत शिडीची वाट चढून गडावर दाखल झालो. नेढ्यात बसून अनुभवलेला भणाणता वारा, चुलीवर केलेली गरम गरम मॅगी, रात्री गुहेत झोपण्याची तयारी या आठवणी न विसरण्यासारख्या.अंधार पडू लागल्यावर मी गायलेलं सांज ये गोकुळी... पुन्हा इतकं छान कधीच जमून आलेलं नाही अद्याप.पूर्ण अंधारात लांबवर दिसणार्‍या एकमेव दिव्याची वाटलेली सोबत आजही अंतर्मुख करते. माकडांच्या अवतरण्याने उगवलेली सकाळ..सकाळी आपले आदिम पूर्वज भेटायला आले.एक माकड आमची एक पिशवी पळवून घेऊन गेलं पण त्याला हवं ते न सापडल्याने त्याने ती पिशवी परत आणून दिली....... आणखी एक पिलू दोन पायांवर उभं राहून आपलीच शेपटी हातात घेउन चाललं होत.... मी आत्ताही हसण्यापासून थोपवू शकत नाही स्वतःला.ते माकडचाळे त्यांनी बंद करावेत म्हणून स्वातीने त्यांना एक उपदेशाचा डोसही पाजला आहे. खूपच धावपळीत असताना मनाला आनंदाची अनुभूती देणारा हा प्रवास..... संस्मरणीय.

No comments:

Post a Comment

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...