Friday, 12 May 2017

पिंपळपान

उन्हाच्या काहिलीने कोमेजलेल्या मोगर्‍यावर वळीव बरसावा.... ध्यानीमनी नसताना कोणीतरी आपली ओंजळ चाफ्याच्या गंधाने भरुन टाकावी इतकं लोभसवाणं हसू,... लहान मुलाच्या हसण्याइतकच निरागस निर्लेप.... माझ्या मनातला आनंद त्या चेहर्‍याला मी जाऊन सांगितला. तो चेहरा कुणाचा हे गौण आहे... महत्वाचं आहे ते त्या चेहर्‍यावर उमटलेलं लाघवी हास्य.कोणत्यातरी वेगळ्या विचारात असलेला तो गंभीर चेहरा माझ्या आनंदाने एका निमिषात उत्फुल्ल होतो.त्याचे सामान्यतः मोहक न भासणारे डोळे क्षणात आनंद पाझरु लागतात. आणि ते भासतात मखमली पेटीत ठेवलेले टपोरे मोती.असं निर्व्याज निरपेक्ष आणि शब्दांशिवाय खूप बोलणारं हास्य माझ्या मनाच्या खोल आत उमटलं आहे. कधीतरी त्याचं पिंपळपान होईल...... 30 डिसेंबर 2016

No comments:

Post a Comment

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...