Friday, 12 May 2017

दुधावरची साय


# last article of my memory sharing# माझी रुकु आजी# माझ्या डायरीतल्या निवडक आठवणी मी share करायचं ठरवलं होतं. आज शेवटी ही भावांजली माझ्या आजीला, आपल्या प्रत्येकाच्या घडणीत "आजी" नावाच्या शब्दालाच दुधाच्या सायीचा स्नेहाद्र ओलावा असतो तसाच तो माझ्याही आहे.माझ्या आईची आई ही माझी आजी तिच्या मायेच्या सान्निध्यातच मी मोठी झाले. लौकिकार्थाने शिक्षित नसलेली रुक्मिणी आजी माझं विद्यापीठच होतं.ओव्या,अभंग हे तिच्या तोंडून ऐकतच मी मोठी झाले. त्या माझ्या इतक्या लक्षात आहेत की आजही दीपान्विताच्या डोळ्यावर पेंग उतरवायला त्या मला मदत करतात.तिचा सुरकुतलेला मऊ हात डोक्यावरुन फिरला की जग जिंकल्याचा आनंद व्हायचा. ताक घुसळताना हाक मारुन तिने भरवलेला मऊसूत लोण्याचा गोळा, तिच्या हातचा कढी वरण भात हे निव्वळ अवीट!गोकुळाष्टमीच्या रात्री तिच्या आवाजात ऐकलेला शामसुंदर गळा,... आरतीचा सूर मनाचा ठाव घ्यायचा,गोपाळकृष्णाच्या तिच्या भक्तीचा अंश तिनै माझ्यातही उतरवला आहे.माझं लग्न ठरतानाच्या बैठकीला आम्ही गेलो तेव्हा जोश्यांचं एकत्र कुटुंब पाहुन मावशीला जरा दडपणच आलं होतं. घरी आल्यावर मी तिला म्हटलं की आजीने आपलं गोकुळ बांधून ठेवलं होतंच की तसंच मी ही हे माझं नवं गोकुळ साभाळायचा प्रयत्न तरी करेन.साहित्य संस्कृत तत्वज्ञान या विषयांवर मी आणि माझ्या मावश्या बोलत असतो हे आजीच्या संस्कारातूनच. आज आजी नाही.... तिचा खापरपणतूही आता कुटुंबाचा सदस्य आहे. तरीही मला माझ्यापेक्षाही माझ्या लेकीसाठी तिची उणीव जाणवते कारण नातवंडं म्हणजे दुधावरची साय तर लाडक्या नातीचं पतवंडं म्हणजे सुवर्ण सु—मनांचा मस्तकाभिषेकच!!!!!!

No comments:

Post a Comment

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...