Friday, 12 May 2017

माझे सुट्य्यांमधील उद्योग



दहावीच्या परीक्षेनंतर मला बाबांनी जवळच्या खाजगी ग्रंथालयात काकांना मदत करायला पाठवलं होतं.मानधन महत्वाचं नसून कामाचा अनुभव मिळेल म्हणून रोज दोन तास जायचचं असा वटहुकुमच बाबांनी काढला होता. उरलेल्या वेळात मैत्रिणींबरोबर धम्मालही केली मी पण पुस्तकांच्या सहवासाची गोडी लागली. 12 वी च्या सुट्टीत मावशीने मला छोट्या मुलांच्या उन्हाळी शिबिरात मदतनीसम्हणून पाठवलं.त्या चिंगुल्यांसोबत मस्त मज्जा यायची आणि स्व कष्टानै मिळवलेले पैसैही.... काकांकडे कायदेशीर कागदपत्र यायची त्यावेळी typing शिकल्याने ते मला काम करायला सांगत with मोबदला! काॅलेजच्या सुट्यात गरवारे बालभवनलाही मदतनीस ताई म्हणून मी गेले आहे.मावशीच्या एका वयस्क मैत्रिणीला पुस्तक वाचून दाखवायला जाणं असो वा कुणाच्या पुस्तकाचं proof reading असो. सुट्टीतली माझी ही कामं मला स्व कष्टाच्या पैशाचं मोल शिकवून गेली.माणसं जोडली गेली आणि लहान वयात अनुभवांची समृद्धीही जमा झाली.गरोदरपणात वाहन चालवायला मनाई होती आणि शरीराने नऊ महिने अन्नाविरुद्ध बंडच पुकारलं होतं, याहक्काच्या सुट्टीतही मी SSY च्या art of patenting course च्या सर्व इंग्रजी साहित्याचं मराठी भाषाँतर करुन दिलं. अशा माझ्या सुट्ट्या! मजेच्या गंमतीच्या आणि जोडीने जिवंत जीवनानुभव देऊन माणूस म्हणूनही घडवणार्‍या.

No comments:

Post a Comment

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.

राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.  प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी  छत्रपती शिवाजी महाराजांचे ...