परब्रह्म भेटी लागी..... कालची सकाळ मी भवानी पेठेत घालवली.मुक्कामाच्या ठिकाणी वारकरी करतात तरी काय ही उत्सुकता होती, ती काल पूर्ण झाली. शितलादेवी चौकापासून उभे असलेले दिंड्यांचे रथ गर्दीची जाणीव करून देत होते. दुतर्फा वारकरी महिला पुरुष फिरत होते. चौकाचौकात गप्पांचे फड रंगले होते.सेवेची संधी घेणारे काही डाॅक्टर स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून वारकर्यांचे उपचार करत होते.काही युवक दुखर्या पायांना मसास करुन देत होते आणि त्याचं समाधान वारकर्यांच्याचेहर्यावरच दिसत होतं.अनेक मंडळांनी न्याहरी,भोजन यांची व्यवस्था केली होती.दिंडीच्या ट्रकमधे काहीजण विश्रांती घेत होते. एके ठिकाणी दिंडीतील काही लोक एकत्र बसून हरिपाठ गात होते.किनरा आवाज,पखवाजची साथ,टाळांचा नाद यामुळे वातावरणात भारलेपणा होता.एका दिंडीच्या अधिपती एक महिला होत्या.त्यांनी फार हौसेने माझ्याकडून स्वतःचे फोटो काढून घेतले.निवडुंग्या विठोबा मंदिराच्या परिसरात एका पक्षातर्फे अभंग गायनाचा कार्यक्रम योजला होता.रस्त्यावर थाटलेल्या बाजारात तर काय मजा होती.गुलाल बुक्काविकणारे,तुळसीमाळा विकणारे,गुलशन कुमारच्या जुन्या भक्तिगीतांचा video दाखविणारे दुकानदार! बॅगेची चेन लावणे,चष्मा दुरूस्ती, बांगड्या भरणे,गोंदवून घेणे असं काय काय होतं त्या जगात!टोप्या आणि खणाची कापडं,रंगीबेरंगी माळा,पिशव्या अशी रंगांची दुनिया.हार तुरे फुलं गजरे यांचं सुगंधी आणि मन मोहवणारं विश्व, खेळणी फुगे यांचं चिमुकलं भावविश्व ! गंधाचं नाम लावणारे तर अनेक जण फिरत होते. वाळत घातलेले कपडे, अंघोळी,मुक्कामाच्या जागेची स्वच्छता अस बरच काही happening world होतं ते.आणि या सगळ्यात कुठे होता तो पांडुरंग? मला दिसला तो..... कुठे माहिती आहे? एका चिमुकल्याच्या निरागस डोळ्यात.त्याला माहितीही नसेल की आपण कुठे चाललो आहोत?डोक्यावर रिबीनीच्या तुर्याचं टोपडं घालून काजळभरल्याडोळ्यांनी तो हे जग अनुभवत होता.मला तो भासला पिंपळपानावरचा बाळकृष्णच!शेवटी तत्व एकच आहे नं व्यापून.परब्रह्माच्या भेटीला निघालेलं हे चिमुकलं परब्रह्म !!!!
Subscribe to:
Post Comments (Atom)
राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.
राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू. प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी छत्रपती शिवाजी महाराजांचे ...
-
राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू. प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी छत्रपती शिवाजी महाराजांचे ...
-
उदो बोला उदो ! डॉ. आर्या आशुतोष जोशी शरद ऋतूचा मन प्रफुल्लित करणारा अनुभव देत देत घटात विराजमान होते आदिमाया, जगज्जननी ! नऊ रा...
-
मनात विचारांचं काहुर पेटवत ती क्षितीजावर रेंगाळत राहिली.... तिची छाया परिसरात आणि मनातही पसरू लागली..... क्षितीजावर तिच्या गुलाबी झाकेचे वि...
No comments:
Post a Comment