लाल मातीच्या ओल्याकंच स्पर्शात नांगर पहुडला आहे.त्याचीही आहे ही विश्रांतीची वेळ! आकाशातून कोसळणार्या सरींच्या सहवासात महिलांच्या हातातली काकणं वाजत आहेत. भातलावणीची लगबग सुरु आहे. चिखलात प्रसन्न मनाने काम करणार्या निळ्या इरल्यांच्या आत बसून हात चालवत या मावशी मधेच काहीबाही बोलत आहेत,एकमेकींशी आणि मधेच आमच्याशी. वर्षभराच्या भाताची बेगमी.अपार कष्टातलं हे आयुष्य! पण निसर्गाच्या साक्षीने तेही साजिरं होतं.खुलून दिसतं.कष्ट करणारे हात त्याचा आनंदही घेतात.
हे सगळं मी लांबून पाहते किंवा माझ्या साहित्यिक आणि शहरी मनाने पाहते म्हणून मला ते फक्त पाहताना त्यातले कष्ट जाणवत नाहीत. मी अनुभवते फक्त तो सोहळा.सर्जनाचा, संस्कृतीचा आणि जगण्याचा!!
हे सगळं मी लांबून पाहते किंवा माझ्या साहित्यिक आणि शहरी मनाने पाहते म्हणून मला ते फक्त पाहताना त्यातले कष्ट जाणवत नाहीत. मी अनुभवते फक्त तो सोहळा.सर्जनाचा, संस्कृतीचा आणि जगण्याचा!!
निसर्गाच्या कुशीत जगणं वाटतं तितकं सहज नाही याची प्रचिती यातून येते. फक्त या हंगामासाठीच वर्षभर बैलजोडी सांभाळणारी मंडळी इथे मी पाहिली. या सगळ्यात अख्खं घरदार दिवसभर शेतात राबतं. मला या सगळ्यात सापडत गेलं आहे निसर्गाचं हिरवेपण.गडद हिरवं,लुसलुशीत पोपटी. मावश्यांच्या हातातली हिरवी काकणं या हिरवाईत खुलतात!फुलतात!सजतात आणि नव्या पिकाची वाट पाहतात दरवर्षी नव्या उमेदीने....
आर्या
No comments:
Post a Comment