काल खूप दिवसांनी युट्युबवर चाणक्य मालिकेचा भाग पाहिला. मन बालपणात गेलं. हल्लीच्या मुलांना खूप वाहिन्यांची उपलब्धता आहे.आंतरजालाच्या जंजाळात खूप माहिती चुटकीसरशी मिळते. पण जेव्हा हे नव्हतं तेव्हाही आपण दर्जेदार कार्यक्रमांनी समृद्ध झालो.
या सर्व मालिकांची शीर्षकगीतंही चपखल असत.त्यातील शब्दांना अर्थ असे जो मालिकेचा सूत्रविषय सांगून जात असे.
नुक्कड,बुनियाद, हमलोग हे तर होतच. पण मला आठवतं आजीबरोबर डाॅ.सरोजिनी बाबर आणि शांताबाई शेळके यांच्या गप्पांचा कार्यक्रम "रानजाई". लोकगीते,लोकपरंपरा,लोकसंस्कृती हे शब्दही मला माहिती नव्हते त्यावेळी हे मी ऐकलं आहे जे कुठेतरी बुद्धीने साठवून ठेवलं.
बाबांबरोबर पाहिलेलं चाणक्य,भारत एक खोज, अईबरोबर पाहिलेलं रविवारचं रंगोली! मी कौटिलीय अर्थशास्र शिकले तेव्हा चंद्रप्रकाश द्विवेदीच समोर येत! Discovery of India वाचलं मोठेपणी तेव्हाही असच झालं.
आणि या सगळ्यात कडी म्हणजे सुरभि. रेणुका शहाणेचं गोड विलोभनीय निवेदन आणि सिद्धार्थ काक यांचा आवाज. रेणुकाच्या साड्या आणि दागिने हेही तेव्हा लक्षात रहात असत. आशय तर समृद्ध करून गेलाच.
दूरदर्शनची मोहिनी आजही मनावर राहिली ती याचमुळे. रामायण, महाभारत आणि मिले सुर मेरा तुम्हारा यासाठी रविवारची वाट पाहिली जायची.त्यातही मज्जा होती. सातच्या बातम्यांची धून तर आजही कानात आहे.
एकूणातच ज्या दूरदर्शनला आता फारसं कुणी विचारतही नाही तो माझ्या मनात मात्र नक्की आहे.
आर्या.

No comments:
Post a Comment