मा मा अर्थात माहेरचा माणूस
हा मनुष्य माझ्या माहेरचा झाला आहे आता.म्हणजे तसा तो सासरचा असायला हवा होता कारण तो माझ्या नवरोबाचा मित्र आहे.पण आता तो माझाही मित्र झाला नव्हे माझ्या माहेरचा माणूस झाला त्याच्या शब्दात.
कसे कुठे ते मला कळेना अनाम नाते जडून आले
नभातूनी चैत्रचाहुलीचा चांदवा मी खुडून आले असं कोण्या कवीने म्हटलय.
अभिजीत गांधीने आमच्या घराचं केलेलं 3D पाहूनच लोकांचे डोळे विस्फारले होते.अनुज्ञाने त्याला मूर्तरूप दिलं. या सगळ्या प्रक्रियेत कुटुंबाची कसरत सांभाळताना माझी उलघाल झाली. ती कुणा तथाकथित पर्यावरणप्रेमीशी मला बोलायचीच नव्हती. मला जे म्हणायचं आहे त्याप्रमाणे माझ्या मतांचा आदर करत आणि माझी मतं दुरूस्त करताना मी दुखावली जाणार नाही अशा पद्धतीने मला नवा रस्ता दाखवत ते काम अभिजीतने केलं.
त्याचा तो व्यावहारिक पण निसर्गप्रेमी संतुलित approach मला अधिक भावला.
त्याच्या सूरावटींवर गायलेलं होठोंसे छुलो तुम असो किंवा त्याच्या आईच्या हातची गरमागरम थालिपीठं रिचवणं असो याला आपोआप एक आत्मीयता आली ती यामुळेच.
मित्र हा मित्र असतोच पण माहेरचा माणूस तुमच्या भूमीत आणि भूमिकेत शिरून तुमचा विचार करू शकतो.तुमची शारिरीक मानसिक अवस्था समजू शकतो. अभिजीतने त्याच्याही नकळत हे माझ्यासाठी केलं आहे.
प्रेमाने आणि समजुतीने त्याने स्वयंपाकघरात केलेली लूडबूड असो किंवा दीपान्वाताशी त्याचं खेळणं असो.ताम्हाण्याच्या प्रकल्पात सगळं जग एका बाजूला वारेमाप कौतूक करत असताना मैत्रीच्या आणि थोड्या मोठ्या वयाच्या अनुभवाने त्याने आशुतोषला या प्रकल्पाची व्यावहारिक बाजूही उलगडून दाखवत माझा मार्ग थोडा सोपा केला आहे.
खरं सांगायचं तर टोकाच्या पर्यावरणवादी विचारसरणीचा नेमका अर्थ उलगडून पाहणं मला निव्वळ कठीण होतं. पण ताम्हाण्याच्या प्रवासात मला मध्यम मार्ग काढत कुटुंब निसर्ग आणि मी स्वतः असा त्रिकोण सावरण्याचं काम करायला बळ दिलं आहे ते केवळ या मा मा ने!
Sunday, 24 February 2019
मा मा
Subscribe to:
Post Comments (Atom)
राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू.
राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू. प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी छत्रपती शिवाजी महाराजांचे ...
-
राजाभिषेकाच्या संदर्भातून दिसून येणारे छत्रपती शिवरायांचे विविध पैलू. प्रा . डॉ . आर्या आशुतोष जोशी छत्रपती शिवाजी महाराजांचे ...
-
उदो बोला उदो ! डॉ. आर्या आशुतोष जोशी शरद ऋतूचा मन प्रफुल्लित करणारा अनुभव देत देत घटात विराजमान होते आदिमाया, जगज्जननी ! नऊ रा...
-
मनात विचारांचं काहुर पेटवत ती क्षितीजावर रेंगाळत राहिली.... तिची छाया परिसरात आणि मनातही पसरू लागली..... क्षितीजावर तिच्या गुलाबी झाकेचे वि...
No comments:
Post a Comment